Himalaya bridge accident report to be postponed | हिमालय पूल दुर्घटनेचा अहवाल लांबणीवर
हिमालय पूल दुर्घटनेचा अहवाल लांबणीवर

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पूल दुर्घटनेला महिना उलटूनही अद्याप अहवाल सादर झालेला नाही. महापालिकेच्या दक्षता विभागाने या दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशीचा अहवाल तयार केला आहे. परंतु रेल्वेकडून कार्यवाही संथगतीने सुरू असून अद्याप त्यांच्या चौकशीचा अहवाल आलेला नाही. यामुळे अंतिम अहवाल लांबणीवर पडला आहे. हा अहवाल आता दोन दिवसांनंतर सादर होण्याची शक्यता आहे.

१४ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास हा पादचारी पूल कोसळून सात जणांचा बळी गेला. या दुर्घटनेत ३० लोक जखमी झाले. या दुर्घटनेनंतर पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दक्षता विभागाला तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
या दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशीचा अहवाल २४ तासांच्या आत सादर केल्यानंतर स्ट्रक्चरल आॅडिटर डी. डी. देसाई या कंपनीवर ठपका ठेवण्यात आला होता.

आणखी काही अधिकाऱ्यांची नावे पुढे येण्याची शक्यता
या पुलाच्या दुरुस्तीचे काम २०१२ मध्ये करणाºया ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस, दोन अभियंते निलंबित, एका अभियंत्याची आणि दोन निवृत्त प्रमुख व उपप्रमुख अभियंत्यांची चौकशी सुरू आहे. या चौकशी अहवालात आणखी काही अधिकाऱ्यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. परंतु, रेल्वेकडून त्यांचा अहवाल सादर न झाल्यामुळे महापालिकेचा अंतिम अहवाल आणि त्यानंतर संबंधितांवर होणारी कारवाईही लांबणीवर पडली आहे.

Web Title: Himalaya bridge accident report to be postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.