Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 17:20 IST2025-07-25T17:18:19+5:302025-07-25T17:20:15+5:30

Mumbai Sex Racket Busted: मुंबईतील अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात एमआयडी पोलिसांना यश आले आहे.

High-Profile Sex Racket Busted At Andheri Hotel; 3 Vietnamese Women Rescued | Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!

AI Image

एमआयडीसी पोलिसांनी अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये परदेशी नागरिकांचा समावेश असलेल्या हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. अंधेरी-कुर्ला रोडवरील टाइम्स स्क्वेअरजवळील एम्पायर सूट हॉटेलमधून हे बेकायदेशीर रॅकेट चालवले जात असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून एका व्यक्तीला अटक केली आणि तीन व्हिएतनामी महिलांची सुटका केली, ज्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहितीची पडताळणी करून त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला हॉटेलमध्ये पाठवले, जिथे हॉटेल मॅनजरने त्या बनावट ग्राहकाचे स्वागत केले. त्यानंतर मॅनेजरने बनावट ग्राहकांना ६,००० रुपयांना लैंगिक सेवा देऊ केल्या आणि आठव्या मजल्यावरील एका खोलीत नेले, जिथे बनावट ग्राहकाची एका व्हिएतनामी महिलेशी भेट झाली. या महिलेने तिच्यासोबत आणखी दोन व्हिएतनामी महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याची माहिती दिली.

या बनावट ग्राहकांकडून पूर्वनियोजित सिग्नल मिळाल्यानंतर पोलीस पथकाने हॉटेलच्या आठव्या आणि नवव्या मजल्यावर छापा टाकला आणि तिन्ही महिलांची सुटका केली. महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी मॅनेजर या महिलांचे फोटो ग्राहकांना ऑनलाइन शेअर करायचा आणि नंतर त्यांना हॉटेलमध्ये पाठवून द्यायचा, असे महिलांनी पोलिसांत माहिती दिली.

Web Title: High-Profile Sex Racket Busted At Andheri Hotel; 3 Vietnamese Women Rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.