भांडुपच्या सनराईज रुग्णालयाला अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 09:37 PM2021-04-27T21:37:16+5:302021-04-27T21:38:09+5:30

Fire in Hospital : सनराईज रुग्णालय पुन्हा सुरू करण्यास नकार देत उच्च न्यायालयाने हॉस्पिटलला अंतरिम दिलासा देण्यास मंगळवारी नकार दिला.

High Court refuses to grant interim relief to Bhandup's Sunrise Hospital | भांडुपच्या सनराईज रुग्णालयाला अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार 

भांडुपच्या सनराईज रुग्णालयाला अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार 

googlenewsNext
ठळक मुद्दे  ११ लोकांचा मृत्यू आगीमुळे झाला, असे म्हणत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी जूनमध्ये ठेवली.

मुंबई : आग लागून ११जण मृत्यू पावलेल्या भांडुप येथील सनराईज रुग्णालय पुन्हा सुरू करण्यास नकार देत उच्च न्यायालयानेहॉस्पिटलला अंतरिम दिलासा देण्यास मंगळवारी नकार दिला. २५ मार्च रोजी ड्रीम मॉलला आग लागली. या मॉलमध्ये असलेल्या सनराईज हॉस्पिटलमधील ११ रूग्णांचा आगीमुळे मृत्यू झाला. 

या घटनेनंतर मुंबई महापालिकेने हॉस्पिटलचे तात्पुरते व्यवसाय प्रमाणपत्र मागे घेतले. मुंबई महापालिकेच्या या निर्णयाला व पुन्हा रुग्णालय सुरू करण्यासाठी सनराईज रुग्णालयाचे मालक प्रिव्हिलेज  हेल्थकेअर सर्व्हिसेस लि. ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.  'आम्ही हे हॉस्पिटल पुन्हा सुरू करण्यासंदर्भात अंतरिम आदेश देणार नाही. ते प्रतिक्षा करू शकतात,' असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले. 

याचिकेनुसार, हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी २५० खाटा उपलब्ध आहेत आणि ऑक्सिजनही आहे. मात्र, मुंबई महापालिकेच्यावतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी या याचिकेवर आक्षेप घेतला. '२५ मार्चच्या दुर्घटनेनंतर पालिकेने हॉस्पिटलला अग्निशमन दलाने दिलेले 'ना-हरकत' प्रमाणपत्र आणि नर्सिंग परवाना रद्द केला. संपूर्ण इमारतीचा वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. पोलिसांनी ही इमारत सीलही केली आहे. पोलिसांनी मॉलच्या मालकविरुद्ध व याचिककर्त्यां कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे,' अशी माहिती साखरे यांनी न्यायालयाला दिली. 

त्यावर याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले की, सुरुवातीला आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली. हॉस्पिटलला आग लागली नाही. ११ रूग्णांचा मृत्यू आगीच्या धुरामुळे गुदमरून झाला. आगीमुळे झाला नाही.  ११ लोकांचा मृत्यू आगीमुळे झाला, असे म्हणत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी जूनमध्ये ठेवली.

Web Title: High Court refuses to grant interim relief to Bhandup's Sunrise Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.