बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 07:00 IST2025-12-24T07:00:40+5:302025-12-24T07:00:58+5:30

ठाकरे  यांच्याकडे मुंबईत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. मात्र, त्यांनी व्यवसायाच्या उत्पन्नाचे अधिकृत स्रोत उघड केले नाहीत. त्यामुळे सीबीआय किंवा ईडीमार्फत याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती.

High Court gives relief to Uddhav Thackeray in disproportionate assets case | बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्धवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. यापूर्वीही असेच आरोप करणारी याचिका फेटाळण्यात आली होती.

ठाकरे यांच्या मालकीचे सामना वृत्तपत्र आणि मार्मिक या साप्ताहिकाने कोरोना काळात कोट्यवधी रुपये कमावले. ठाकरे  यांच्याकडे मुंबईत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. मात्र, त्यांनी व्यवसायाच्या उत्पन्नाचे अधिकृत स्रोत उघड केले नाहीत. त्यामुळे सीबीआय किंवा ईडीमार्फत याची चौकशी व्हावी, अशी मागणी अभय भिडे यांनी याचिकेद्वारे केली. न्या. अजय गडकरी व न्या. रणजित भोसले यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती.

या याचिकेमध्ये ज्या मागण्या केल्या आहेत, तशाच मागणी करणारी याचिका तीन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे त्याच मागण्यांसाठी करण्यात आलेल्या नव्या याचिकेवर सुनावणी घेण्यात अर्थ नाही. ही याचिका सुनावणीयोग्य नाही, असे म्हणत न्यायालयाने भिडे यांना कायदेशीर सल्ला घेण्याची सूचना केली.

तीन वर्षांपूर्वी भिडे यांच्या मुलीने न्यायालयात ठाकरे यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. याचिका  केवळ तर्कावर आधारित असून, केलेल्या आरोपांच्या समर्थनार्थ कोणतेही पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी भिडे यांच्या मुलीची याचिका फेटाळली होती.

Web Title : उद्धव ठाकरे के खिलाफ आय से अधिक संपत्ति मामले में कोर्ट से राहत

Web Summary : बॉम्बे हाईकोर्ट ने उद्धव ठाकरे की संपत्ति की जांच की मांग वाली याचिका खारिज कर दी। याचिकाकर्ता ने आय से अधिक संपत्ति का आरोप लगाया और सीबीआई या ईडी जांच की मांग की। अदालत ने कहा कि इसी तरह की याचिका पहले खारिज हो चुकी है, सबूतों का अभाव है।

Web Title : Court Rejects Plea Against Uddhav Thackeray in Disproportionate Assets Case

Web Summary : The Bombay High Court dismissed a petition seeking investigation into Uddhav Thackeray's assets. The petitioner alleged disproportionate assets and sought CBI or ED inquiry. The court noted a similar petition was rejected three years prior, lacking evidence.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.