मुंबईत रंगला ऊन-पावसाचा खेळ, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 06:05 AM2019-08-11T06:05:20+5:302019-08-11T06:05:34+5:30

महापुराचा तडाखा बसलेल्या पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने आता विश्रांती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

heavy rains in Some places in next few day's | मुंबईत रंगला ऊन-पावसाचा खेळ, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

मुंबईत रंगला ऊन-पावसाचा खेळ, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

Next

मुंबई : महापुराचा तडाखा बसलेल्या पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने आता विश्रांती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे या चारही जिल्ह्यांसाठीचा अतिवृष्टीचा इशारा पूर्णत: निवळला असला तरीही मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबईमध्ये आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. मुंबई आणि उपनगराचा विचार करता शनिवारी दोन्हीकडे ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. विशेषत: उपनगरात एखाद-दुसरी मुसळधार सर कोसळल्यानंतर काही काळासाठी ऊन पडत असल्याचे चित्र होते. दुपारी ऊन-पावसाचा खेळ थांबला आणि मुंबईवर ढगाळ वातावरण पाहायला मिळाले.
आज कोकण, गोव्यात मुसळधार
११ आॅगस्ट रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील.
१२ आॅगस्ट रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. महाराष्ट्र आणि गोवा किनारी सोसाट्याचा वारा वाहील.
१३ आणि १४ आॅगस्ट रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Web Title: heavy rains in Some places in next few day's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.