रविवार, सोमवारी कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईतील वैद्यकीय सेवेवर झाला परिणाम

By संतोष आंधळे | Published: July 8, 2024 11:43 PM2024-07-08T23:43:43+5:302024-07-08T23:44:35+5:30

खासगी रुग्णलयातील परिस्थिती सुद्धा तशीच होती.

Heavy rains on Sunday midnight and Monday affected medical services in Mumbai | रविवार, सोमवारी कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईतील वैद्यकीय सेवेवर झाला परिणाम

रविवार, सोमवारी कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईतील वैद्यकीय सेवेवर झाला परिणाम

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रविवारी मध्यरात्री आणि सोमवारी कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर ठिक-ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीची सेवा विस्कळीत झाली होती. या पावसाचा परिणाम मुंबईतील महापालिकेच्या आणि शासनाच्या मुख्य रुग्णालयातील सेवेवर झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्यामुळे रूग्णालयात काही कर्मचारी पोहचू शकले नाही. त्याचप्रमाणे याचा परिणाम रुग्णालयातील ओपीडी वर झाला असून रुग्णसुद्धा रुग्णालयात कमी प्रमाणात आले होते.

पावसामुळे झालेल्या हाहाकारामुळे सोमवारी महापालिकेने शाळा कॉलेजेसना सुट्टी देण्यात आली होती. या पावसाचा पावसाचा परिणाम मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील के इ एम, सायन, नायर, कूपर आणि जेजे रुग्णालयात दिसून आला आहे. अनेक रुग्णालयातील कर्मचारी वेळेवर पोहचले नाही किंवा काही येऊ शकले नाही. मात्र रुग्णालयातील सेवा अविरतपणे सुरु होती. रुग्णालयाला आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यांना उपचार देण्यात आले. त्यासोबत उपचारासाठी रुग्ण दाखल करण्याच्या संख्येवर सुद्धा परिणाम झाला होता.

खासगी रुग्णलयातील परिस्थिती सुद्धा तशीच होती. अतितात्काळ विभागात उपचार देण्याचे काम सुरु असले तरी नियमित ओपीडीवर याचा परिणाम दिसून आला आहे. काही ठिकणी ज्या नियोजित शस्त्रकिया होत्या त्या करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

पावसामुळे अनेक कर्मचारी रुग्णलयात पोहचू शकले नाही. त्यामुळे मनुष्यबळ कमी असल्याचे दिसून आले. कारण पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. तसेच रुग्ण संख्याही कमी होती. नियोजित शस्त्रक्रिया होत्या, त्या करण्यात आल्या आहेत.
-डॉ सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त (आरोग्य), मुंबई महानगरपालिका

Web Title: Heavy rains on Sunday midnight and Monday affected medical services in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.