Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Rain: नालासोपाऱ्यात रेल्वे रुळ पाण्याखाली; वसई-विरार दरम्यानची लोकल सेवा ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 09:26 IST

पश्चिम रेल्वेला पावसाचा तडाखा

मुंबई: रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर सकाळीदेखील कायम असल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नालासोपाऱ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं वसई ते विरार दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. विरारहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांनादेखील पावसाचा फटका बसला आहे.

विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्या 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत आहेत. यामुळे चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं लोकल गाड्यांचा वेग मंदावला आहे. बोरिवलीकडून चर्चगेटच्या दिशेनं धावणाऱ्या लोकल गाड्यादेखील 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत आहेत. त्यामुळे फलाटांवर मोठी गर्दी झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवेचा खोळंबा झाल्यानं प्रवाशांना प्रचंड मनस्ताप भोगावा लागत आहे. 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटमुंबईविरारपाऊसवसई विरार