तब्येत बिघडली, रेल्वे घेणार काळजी; 'रेल मदत' अॅप सुविधा ठरतेय लाभदायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:27 IST2026-01-05T12:26:11+5:302026-01-05T12:27:22+5:30

प्रवाशांच्या तक्रारींवर अवघ्या ५ ते १० मिनिटांत दखल घेतली जाते.

health deteriorates railways will take care of it rail Madad app facility is proving beneficial | तब्येत बिघडली, रेल्वे घेणार काळजी; 'रेल मदत' अॅप सुविधा ठरतेय लाभदायक

तब्येत बिघडली, रेल्वे घेणार काळजी; 'रेल मदत' अॅप सुविधा ठरतेय लाभदायक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. डब्यातील अस्वच्छता, कर्मचाऱ्यांचे असहकार्य, चोरी, सुरक्षिततेचा प्रश्न किंवा अचानक तब्येत बिघडणे अशा तक्रारींच्या तत्काळ निवारणासाठी भारतीय रेल्वेने 'रेल मदत' अॅपची सुविधा उपलब्ध केली आहे. या अॅपद्वारे प्रवाशांच्या तक्रारींवर अवघ्या ५ ते १० मिनिटांत दखल घेतली जाते.

'रेल मदत' हे रेल्वेचे तक्रार निवारण अॅप आहे. प्रवाशाने प्रवासादरम्यान कोणतीही अडचण अॅपवर नोंदवल्यास ती थेट संबंधित विभाग, ऑनबोर्ड स्टाफ, स्टेशन व्यवस्थापक किंवा कंट्रोल रूमकडे पाठवली जाते. त्यामुळे समस्येचे तत्काळ निरसन शक्य होते. या अॅपवर वैद्यकीय मदत, चोरी व सुरक्षितता, रेल्वेतील अस्वच्छता, तसेच कर्मचाऱ्यांविषयी तक्रार अशा विविध स्वरूपाच्या तक्रारी नोंदवता येतात. प्रवासादरम्यान प्रवाशाची तब्येत बिघडल्यास २४ तास कार्यरत वैद्यकीय टीमकडून मदत दिली जाते.

प्रवाशांना मिळतात या सुविधा...

वैद्यकीय मदत: प्रवासादरम्यान तब्येत बिघडल्यास डॉक्टर/मेडिकल टीम पुढील स्टेशनवर उपलब्ध, गरज पडल्यास रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात येते.

चोरी, सुरक्षितता : सामान चोरी, संशयास्पद व्यक्ती, महिलांच्या सुरक्षिततेसाठी तक्रार करता येते.

रेल्वेतील अस्वच्छता : डबा, शौचालय, प्लॅटफॉर्मवरील घाण, पाणी साचणे आदी तक्रारी.

कर्मचाऱ्यांविषयी तक्रार: असभ्य वर्तन, मदत न मिळणे, नियमभंग याबाबत तक्रार, तक्रारीचे लाइव्ह स्टेटस पाहता येते. निरसन झाल्याची माहिती अॅपवरच मिळते.

तक्रारीचे लाइव्ह ट्रॅकिंगही अॅपवर उपलब्ध

तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित विभागाकडून प्रवाशाला ५ ते १० मिनिटांत फोनवरून संपर्क साधला जातो. समस्येची माहिती घेऊन तातडीने उपाययोजना केल्या जातात. तसेच, तक्रारीचे स्टेटस अॅपवर पाहता येते आणि निरसन झाल्यानंतरही प्रवाशाकडून फीडबॅक घेतला जातो. 'रेल मदत' अॅप वापरण्यासाठी प्रवाशाने मोबाइलमध्ये अॅप डाउनलोड करून मोबाइलद्वारे लॉग-इन करावे.

पीएनआर क्रमांक टाकून तक्रारीचा प्रकार निवडून तक्रार सबमिट करता येते. नोंदवलेल्या तक्रारीचे लाइव्ह ट्रॅकिंगही अॅपवर उपलब्ध आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि सोयीसुविधांना भारतीय रेल्वे सर्वोच्च प्राधान्य देते. 'रेल मदत' अॅपमुळे तक्रारींचे जलद, पारदर्शक आणि प्रभावी निवारण शक्य झाले आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title : रेल मदद ऐप: यात्रा में तबीयत बिगड़ने पर रेलवे करेगा देखभाल

Web Summary : रेल मदद ऐप यात्रियों की शिकायतों, जैसे चिकित्सा आपात स्थिति और सुरक्षा संबंधी चिंताओं का तुरंत समाधान करता है। रेलवे कर्मचारियों द्वारा त्वरित कार्रवाई और रीयल-टाइम ट्रैकिंग कुशल समाधान सुनिश्चित करते हैं। यात्रियों को अपडेट मिलते हैं और वे प्रतिक्रिया दे सकते हैं, जिससे ट्रेन यात्रा के दौरान सुरक्षा बढ़ती है।

Web Title : Rail Madad App: Railways to Care if Health Fails During Travel

Web Summary : Rail Madad app swiftly addresses passenger grievances, including medical emergencies, safety concerns, and hygiene issues. Real-time tracking and quick action by railway staff ensure efficient resolution. Passengers receive updates and can provide feedback, enhancing safety and convenience during train journeys.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.