आरोग्य विभागाच्या परीक्षेचं प्रवेशपत्र जारी, पण डाऊनलोड करताना तांत्रिक अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 02:16 PM2021-09-22T14:16:36+5:302021-09-22T14:30:22+5:30

प्रवेशपत्र डाऊनलोड करताना तांत्रिक अडचणींचा सामना उमेदवारांना करावा लागत आहे. त्यामुळे, उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत, वेसबाईटला दोष दिला आहे.

Health department exam admission card issued, technical difficulty while downloading | आरोग्य विभागाच्या परीक्षेचं प्रवेशपत्र जारी, पण डाऊनलोड करताना तांत्रिक अडचणी

आरोग्य विभागाच्या परीक्षेचं प्रवेशपत्र जारी, पण डाऊनलोड करताना तांत्रिक अडचणी

Next
ठळक मुद्देया भरतीप्रक्रियेत ज्या उमेदवारांनी संबंधित पदासाठी अर्ज केलाय  ते arogya.maharashtra.gov.in या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करू शकता.

मुंबई - राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासकीय विभागात विविध पदांच्या भरतीसाठी काही दिवसांपूर्वी जाहिरात निघाली होती. आता, या भरतीप्रकियेची परीक्षा समोर येऊन ठेवली आहे. त्यासाठी होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. मात्र, हे प्रवेशपत्र डाऊनलोड करताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येतंय. कुठे परीक्षेचं प्रवेशपत्रच डाऊनलोड होत नाही, तर कुठे सर्व्हरच डाऊन असतो. त्यामुळे, उमेदवार काळजीत पडले आहेत.  

सार्वजनिक विभागाच्या भरतीअंतर्गत ग्रुप सी आणि ग्रुप डी प्रवर्गातील स्टोअर गार्ड, प्रयोगशाळा शास्त्रज्ञ अधिकारी, फार्मास्युटिकल अधिकारी, स्टाफ नर्स, कनिष्ठ लिपिक आणि इतर रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदभरतीसाठी २५ आणि २६ सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. विभागाच्या सूचनेनुसार सध्या प्रवेशपत्र वेबसाइटवर लॉगिन करून डाऊनलोड करता येईल. मात्र, प्रवेशपत्र डाऊनलोड करताना तांत्रिक अडचणींचा सामना उमेदवारांना करावा लागत आहे. त्यामुळे, उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत, वेसबाईटला दोष दिला आहे. तसेच, ही समस्या लवकरात लवकर सुटावी, अशी मागणीही केली आहे.

या भरतीप्रक्रियेत ज्या उमेदवारांनी संबंधित पदासाठी अर्ज केलाय  ते arogya.maharashtra.gov.in या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करू शकता. तसेच nrhm.maharashtra.gov.in वर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइटवरूनही प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. 

असं करा डाऊनलोड

उमेदवारांनी arogya.maharashtra.gov.in किंवा nrhm.maharashtra.gov.in वर लॉगिन करावे

त्यानंतर आरोग्य विभाग महाराष्ट्र प्रवेशपत्र २०२१ या लिंकवर क्लिक करा

एक नवीन पेज उघडेल

उमेदवारांनी महत्वाची माहिती भरा

प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल

आरोग्य विभाग महाराष्ट्र २०२१ परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. दरम्यान, सध्या अनेकवेळा तांत्रिक अडचण येत आहे. 

सोलापूर सर्कलमधील ग्रुप (ड) संवर्गातील सर्व पदासाठी मी अर्ज भरला आहे. त्यासाठी, 26 सप्टेंबर रोजी परीक्षा होणार आहे. मात्र, मंगळवार रात्रीपासून मी प्रयत्न करतोय. पण, अद्यापही प्रवेशपत्र डाऊनलोड झाले नाही. वेबसाईट नीटपणाने सुरू नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. 
योगेश बाबर
बार्शी, जिल्हा- सोलापूर

बालाजी मुरकुटे यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या आहेत. 

Read in English

Web Title: Health department exam admission card issued, technical difficulty while downloading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.