ओडिशातून विमानाने मुंबईत यायचा, ज्येष्ठ नागरिकांना एटीएममध्ये भेटायचा अन् पैसे लुटायचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 19:49 IST2026-04-01T19:48:32+5:302026-04-01T19:49:34+5:30

Mumbai Crime news: मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी एका ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली. हा आरोपी ओडिशामधून विमानाने मुंबईत येऊन ज्येष्ठ नागरिकांना लुटत होता. 

He would fly to Mumbai from Odisha, meet senior citizens at ATMs and rob them of money. | ओडिशातून विमानाने मुंबईत यायचा, ज्येष्ठ नागरिकांना एटीएममध्ये भेटायचा अन् पैसे लुटायचा

ओडिशातून विमानाने मुंबईत यायचा, ज्येष्ठ नागरिकांना एटीएममध्ये भेटायचा अन् पैसे लुटायचा

Mumbai Crime: ओडिशा येथून विमानाने मुंबईत येऊन एटीएम केंद्रात वयोवृद्धांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणारा सराईत आरोपी संभवकुमार आचार्य (३५) याला दिंडोशी पोलिसांनी २८ मार्चला अटक केली आहे. तो मागील चार वर्षांपासून फरार होता. त्याच्या चौकशीत चार गुन्हे उघडकीस आले असून, २५ सीमकार्ड आणि दोन मोबाइल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.

तक्रारदार विश्वास भुसाने (७१) हे २० फेब्रुवारीला मालाड पूर्वेकडील राणीसती मार्ग येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता, एका अनोळखी व्यक्तीने हातचलाखी करून त्यांचे एटीएम कार्ड बदलले. त्यानंतर त्यांच्या खात्यातून विनापरवानगी ४० हजार रुपये काढले. याप्रकरणी दिंडोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विविध गुन्हे उघडकीस

पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद सुर्वे, उपनिरीक्षक अजित देसाई व पथकाने मागील महिन्यात ६० ते ७० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, तसेच तांत्रिक तपास करत बिगारी कामगार संभवकुमार आचार्य (रा. वसई पूर्व) याला अटक केली. त्याच्या चौकशीत दिंडोशी, कस्तुरबा, वनराई, कुरार पोलिस ठाण्यांतील गुन्ह्यांची उकल झाली आहे.

आरोपीकडून एटीएम कार्ड, मोबाइल जप्त

आचार्य याच्याकडून रोख रक्कम, विविध बँकांचे २५ एटीएम कार्ड, दोन मोबाइल फोन जप्त केले आहेत. पुढील तपास उपनिरीक्षक देसाई करत आहेत. मागील चार वर्षांपासून त्याने मुंबई, ठाणे आणि ओडिशा येथे अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

Web Title : ओडिशा से मुंबई आकर ATM में बुजुर्गों को लूटता था शातिर!

Web Summary : ओडिशा का एक व्यक्ति विमान से मुंबई आकर एटीएम में बुजुर्गों के कार्ड बदलकर पैसे चुराता था। दिंडोशी पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया, चार मामले सुलझाए और सिम कार्ड बरामद किए। उसने मुंबई, ठाणे और ओडिशा में अपराध कबूल किए।

Web Title : Odisha man flew to Mumbai, robbed seniors at ATMs.

Web Summary : A man from Odisha, posing as a helper, exchanged ATM cards of senior citizens and stole money. Dindoshi police arrested the accused, solving four cases and recovering SIM cards and phones. He confessed to crimes across Mumbai, Thane, and Odisha.