Anant Garje News: "त्याचे बाहेर विवाहबाह्य संबंध होते. गौरीने त्याला माफ केले होते. पण, त्यानंतरही तो चॅटिंग करत होता. तिने ते पाहिले. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाले. तो तिला खूप त्रास देत होता. तो मी आत्महत्या करण्याची धमकी देऊन तुला अडकवणार, अशी धमकी द्यायचा", असा धक्कादायक खुलासा मयत डॉक्टर गौरी पालवे यांच्या मामाने केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना गौरी पालवे यांचे मामा शिवराज गर्जे म्हणाले की, "पंकजा मुंडेंना माहिती नव्हते की, हा माणूस किती नालायकपणा करतोय. त्यांचा यात काही विषय नाहीये. त्यांचा पीए अनंत गर्जे याने गौरीच्या वडिलांना कॉल केला. ते बीडमध्ये होते. कॉल केल्यानंतर कट केला. नंतर तिच्या आईला कॉल केला. 'तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे आणि तिचा मृतदेह माझ्यासमोर आहे' असे त्याने कॉल करून सांगितले", अशी माहिती शिवदास गर्जे यांनी दिली.
तिने त्याला पुन्हा चॅटिंग करताना पाहिले
"दोन महिन्यांपासून गौरी आणि त्याचा वाद सुरू होता. गौरीला त्याची काही प्रकरणेही माहिती झाली होती. काही अफेअर होते. तिने त्याला माफ केलं होतं. पण, चॅटिंग करताना त्याने तिला पाहिले आणि त्यानंतर पुन्हा वाद सुरू झाले. तो गौरीला खूप टॉर्चर (छळवणूक) करत होता", असे त्यांनी सांगितले.
"त्याने स्वतःच्या हातावर वार केले होते. तिला म्हणायचा की, मी पण मरेन आणि तुला पण अडकवेन. ती डॉक्टर होती. लढणारी मुलगी होती. तिने कधीच आत्महत्या केली नसती. त्याने खूप तिचा खूप छळ केला", असे गौरी यांच्या मामाने सांगितले.
त्याचे वडील इथे हसताहेत
"तो फरार झाला आहे. त्याचे भाऊ आणि वडील इथे घराच्या बाहेर हसत आहेत. तुम्ही जर काहीच केलं नाहीये, तर तुम्ही थांबायला पाहिजे होतं. पोलीस ठाण्यात थांबायचं होतं. पंकजा मुंडेंचा यात काही दोष नाही. त्याला लाथ मारून हाकलून देतील. असले नालायक लोक पंकजा मुंडे सांभाळत नाहीत", असा संताप गौरीच्या मामाने व्यक्त केला.
Web Summary : Gauri's uncle revealed Anant's affairs, threats of suicide to implicate her, and harassment. He accused Anant of fleeing after Gauri's death, while his family showed no remorse. He clarified Pankaja Munde's lack of involvement.
Web Summary : गौरी के मामा का खुलासा: अनंत के अफेयर थे, उसने आत्महत्या की धमकी देकर गौरी को फंसाने और प्रताड़ित करने की धमकी दी। गौरी की मौत के बाद अनंत फरार हो गया, परिवार बेपरवाह दिखा। पंकजा मुंडे की संलिप्तता नहीं बताई।