लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून कुर्ल्यात भाजप कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ उडाली. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी मुख्य आरोपी जलील शेखला अटक केली असून, त्याला २३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी जलीलच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. त्यांची नावे शराण, इसाक, शानू, अहमद अशी आहेत.
कुर्ला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ जानेवारीला सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कुर्ला पश्चिमेच्या न्यू मिल रोडवर घडली. याप्रकरणी सहा जणांविरोधात दंगल आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी भाजप कार्यकर्त्यांची नावे आकाश सिंग, आदित्य पानसे आणि असीम सिंग अशी आहेत.
अचानक आकमक पवित्रा
असीम सिंग दुचाकीवरून न्यू मिल रोडने घरी निघाले असताना एक जण दुकानाच्या बाहेरच दुचाकी पार्क करून उभा होता. दुचाकी काढण्यास अडचण होत असल्याने त्यांनी संबंधिताला ती बाजूला घेण्यास सांगताच त्याने शिवीगाळ केली. सिंग यांनी जाब विचारताच त्यांना मारहाण करण्यात आली. आरोपींनी बेल्ट, प्लॅस्टिकच्या कॅरेट्स, बांबूने, हेल्मेटने मारहाण केली. एका फेरीवाल्याने आकाश सिंग यांच्या डोक्यावर पेव्हर ब्लॉकने प्रहार केल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. नाकाचे हाड फॅक्चर झाले आहे. आदित्य पानसे आणि असीम सिंग यांनाही जबर मारहाण करण्यात आली आहे.
Web Summary : In Kurla, illegal vendors assaulted BJP workers after a parking dispute. One worker is critically injured. Police arrested the main accused, Jaleel Sheikh, and are searching for his accomplices. The incident occurred on New Mill Road. A case of rioting and attempted murder has been registered.
Web Summary : कुर्ला में पार्किंग विवाद के बाद फेरीवालों ने भाजपा कार्यकर्ताओं पर हमला किया। एक कार्यकर्ता गंभीर रूप से घायल। पुलिस ने मुख्य आरोपी जलील शेख को गिरफ्तार किया और उसके साथियों की तलाश जारी है। घटना न्यू मिल रोड पर हुई। दंगा और हत्या के प्रयास का मामला दर्ज।