भोंदू अशोक खरातसोबत फोटो आहेत म्हणजे दोषी नाही; CM देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 06:10 IST2026-03-28T06:09:38+5:302026-03-28T06:10:48+5:30

खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांना सहआरोपी करावे. माजी मंत्री दीपक केसरकर, चाकणकर व भाेंदू खरात यांचे कॉल रेकॉर्ड तपासावे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

having photos with impostor ashok kharat means he is not guilty cm devendra fadnavis clarifies | भोंदू अशोक खरातसोबत फोटो आहेत म्हणजे दोषी नाही; CM देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

भोंदू अशोक खरातसोबत फोटो आहेत म्हणजे दोषी नाही; CM देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे राज्यातील अनेक बड्या नेत्यांसोबतचे व्हिडीओ, फोटो व्हायरल झाल्यानंतर या नेत्यांवर कारवाईची मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, असे केवळ कोणासोबत फोटो, व्हिडीओ आहेत म्हणून दोषी ठरत नाही अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर शुक्रवारी मांडली. 

आणखी धक्कादायक माहिती अशोक खरात प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. ते म्हणाले की, या प्रकरणात आम्ही अतिशय खोलवर जाऊन तपास करत आहोत. अनेक गोष्टी समोर येत आहेत. आणखी काही एफआयआर होण्याची शक्यता आहे. काही महिलादेखील समोर येत आहेत. खरातने आर्थिक फसवणूक केली म्हणूनही काही जण पुढे येत आहेत, त्याबाबतही गुन्हे दाखल केलेच जातील. 

व्हिडीओ व्हायरल केल्यास फौजदारी कारवाई करणार

अशोक खरातशी संबंधित काही व्हिडीओ सोशल मीडियावर काही जण टाकत असून त्याद्वारे संबंधित महिलांची बदनामी होत आहे. आम्ही असे व्हिडीओ हटवत  आहोत पण ते व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. दुर्दैवाने या प्रकरणात बळी पडलेल्या महिलांचे  व्हिडीओ अपलोड करणे, व्हायरल करणे, फॉरवर्ड करणे हा गुन्हा आहे, त्यांच्यावर आणि त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया टाकत आहेत अशांवरही फौजदारी कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

‘चाकणकरांना सहआरोपी करा‘ 

नाशिक: खरात याने केलेल्या लैंगिक अत्याचार  प्रकरणात रूपाली चाकणकर यांना सहआरोपी करावे. तसेच माजी मंत्री दीपक केसरकर, चाकणकर व भाेंदू खरात यांचे कॉल रेकॉर्ड तपासावे, अशी मागणी उद्धवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी  केली.  अंधारे यांच्यासह राष्ट्रवादीच्या (अजित पवार) नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांनी  एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांची भेट घेऊन चाकणकर यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी केली  आहे.     

खरातची एचआयव्ही चाचणी निगेटिव्ह

भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या पार्श्वभूमीवर त्याची एचआयव्ही तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आल्याचे सूत्रांनी सांगितले. खरातच्या कार्यालयात शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही एसआयटी पथकाने तपासणी करून काही कागदपत्रे व वस्तू जप्त केल्या.

 

Web Title : धोखेबाज अशोक खरात के साथ तस्वीरें होने का मतलब दोषी नहीं: सीएम फडणवीस

Web Summary : सीएम फडणवीस ने कहा कि अशोक खरात के साथ तस्वीरें होने से कोई दोषी साबित नहीं होता। खरात की धोखाधड़ी की जांच जारी है, और अधिक एफआईआर होने की संभावना है। एचआईवी परीक्षण नकारात्मक। ऑनलाइन वीडियो साझा करने पर आपराधिक आरोप लगेंगे।

Web Title : Photos with fraudster Kharat don't imply guilt: CM Fadnavis clarifies.

Web Summary : CM Fadnavis stated photos with Ashok Kharat don't prove guilt. Investigation into Kharat's fraud continues, more FIRs likely. HIV test negative. Sharing related videos online will lead to criminal charges.