Join us  

'मजा तो तब है, जब'... नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राऊतांचा शायरीतून टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 10:13 AM

नागपुरात आजपासून नवीन सरकारचं पहिलंच हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.

मुंबई - काँग्रेसचा पाठिंबा घेऊन राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेनं सरकार स्थापन केलं. त्यामध्ये खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरली. मात्र, काँग्रेससोबत जुळवून घेताना शिवसेनेला कसरत करावी लागत आहे. माझं नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. त्यामुळे माफी मागणार नाही, अशा स्पष्ट शब्दांमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर, संजय राऊत यांनी राहुल गांधींना सूचक इशारा दिलाय. राऊत यांनी आज पुन्हा एक शायरी ट्विट करत विरोधकांना लक्ष्य केलं आहे.

नागपुरात आजपासून नवीन सरकारचं पहिलंच हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. तसेच, विरोधकांकडून सावरकर यांच्याबद्दलच्या शिवसेनेच्या भूमिकेबाबतही मत मांडलं. सावरकर यांच्याबाबतच्या भूमिकेवरुन शिवसेनेला भाजपाकडून टार्गेट करण्यात येत आहे. राऊत यांनी आपल्या शायराना अंदाजातून भाजपा नेत्यांना टोला लगावला.   

संजय राऊत यांनी निवडणूक निकालानंतर शेरो-शायरीतून भाजपा नेत्यांवर जबरी टीका केली. राऊत यांच्या या शायरीटोल्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक हेही सहभागी होत. नवाब मलिकही शायरीद्वारे आपलं मत व्यक्त करत, संजय राऊत यांना ट्विटरमध्ये टॅग करत होते. आज पुन्हा नवाब मलिक यांनी राऊत यांना टॅग करुन एस शायरी शेअर केली आहे.

दोस्तों में मशहूर हुए तो क्या मज़ा...**मज़ा तो तब है..**जब चर्चा दुश्मनों की महफ़िल में हो...!असे ट्विट करुन संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांकडून होणाऱ्या टीकेतील चर्चेबद्दल व्यक्त केलं आहे. 

दरम्यान, रेप इन इंडिया या विधानावरुन राहुल यांनी माफी मागावी, अशी भूमिका भाजपानं घेतली. मात्र राहुल यांनी माफी मागण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यावेळी त्यांनी थेट सावरकरांचा उल्लेख केला. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दोन ट्विट करुन राहुल गांधींना सूचक इशारा दिला. 'वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही. जय हिंद,' असं संजय राऊत यांनी त्यांच्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे,' अशा शब्दांमध्ये राऊत यांनी राहुल गांधींचं नाव न घेता त्यांना सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस-शिवसेना यांच्यातील हे शीतयुद्ध नवाब मलिक यांनी शायरीतून व्यक्त केलं आहे. 

अभी तो इस बाज की असली उड़ान बाकी हैअभी तो इस परिंदे का इम्तिहान बाकी है अभी अभी मैंने लांघा है समुंदरों कोअभी तो पूरा आसमान बाकी है

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाभाजपानागपूरराहुल गांधी