Join us
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिक पटेल उद्या मुंबईत, मुंबई काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमशी साधणार संवाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 15:24 IST

हार्दिक पटेल उद्या मुंबईला येणार आहे.

मुंबई- सामाजिक कार्यकर्ते हार्दिक पटेल उद्या गुरुवार दिनांक २२ फेब्रुवारी २०१८ रोजी मुंबईला येणार आहेत. या भेटीदरम्यान ते  संध्याकाळी ४ वाजता मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुंबई काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमशी संवाद साधणार आहेत. आजच्या युगात सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्याचे आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पहिले जाते.  फेसबुक, ट्विटर, व्हाट्सऍपच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूसदेखील आपले विचार, आपल्या भावना जगासमोर मांडू शकतो. या सोशल मीडियाचा अचूक आणि प्रभावी वापर कसा करावा, याविषयी हार्दिक पटेल मुंबई काँग्रेसच्यासोशल मीडिया टीमला मार्गदर्शन करणार आहेत. या प्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :हार्दिक पटेलमुंबईकाँग्रेससोशल मीडिया