एच पश्चिम वॉर्ड; पश्चिम उपनगराचे प्रवेशद्वार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 10:07 AM2023-12-19T10:07:36+5:302023-12-19T10:09:37+5:30

पश्चिम उपनगराचे प्रवेशद्वार म्हणून ओळख.

H West Ward Entrance to the western suburbs know all the information regarding western line | एच पश्चिम वॉर्ड; पश्चिम उपनगराचे प्रवेशद्वार

एच पश्चिम वॉर्ड; पश्चिम उपनगराचे प्रवेशद्वार

पश्चिम उपनगराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रभागातील शांत गल्ल्यांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार कलावंत सहज चालतानाही नजरेस पडतात. अनेक पिढ्यांपासून वास्तव्य असल्याने रहिवासी एकमेकांना ओळखतात आणि प्रश्नही सोडवतात. वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी विकासकामे आणि सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा यांचा समन्वय राखणे हे या प्रभागासमोरील आव्हान आहे.

हद्द-पूर्व-पश्चिम 

पश्चिम हद्द : अरबी समुद्र
दक्षिण हद्द : माहीम कॉजवे 
उत्तर हद्द : एसएनडीटी महाविद्यालय, मिलन सबवे 

वॉर्डाचे वैशिष्ट्य :

पश्चिम उपनगरातील उच्चभ्रू लोकवस्तीच्या या परिसरात इतिहास व ऐश्वर्य यांचा मिलाफ झाला आहे. पाली हिल, वांद्रे किनारा भागातील टुमदार बंगले इतिहास जमा होत असतानाच आलिशान इमारतींमुळे शान कायम आहे. 
    
 स्वत:च्या हक्कांविषयी कायम जागरूक असलेल्या रहिवाशांमुळे या भागात शहराच्या इतर भागांत जाणवणाऱ्या नागरी समस्या तीव्र नाहीत.

वॉर्डातील मुख्य समस्या  :

एच वॉर्ड म्हणजे पश्चिम उपनगराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. प्रभागातील पूर्वी बनवलेल्या गल्ल्या आता मुख्य रस्ते झाले असल्याने या भागात प्रचंड वाहतूककोंडी होते. मेट्रो कामामुळे भर पडत आहे. मात्र, मेट्रोचे काम झाल्यानंतर ही वाहतूककोंडी फुटून प्रवेशद्वारातून वाहतूक सुसाट होईल, हीच अपेक्षा आहे. 

महापालिका प्रभाग माजी नगरसेवक : 

हेतल गाला : वॉर्ड क्र. ९७ 
अलका केरकर : वॉर्ड क्र. ९८ 
संजय अगलदरे : वॉर्ड क्र. ९९ 
स्वप्ना म्हात्रे : वॉर्ड क्र. १००  
असिफ झकारिया : वॉर्ड क्र. १०१ 
मुमताझ खान : वॉर्ड क्र. १०२

एकीकडे शहराचा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा या विभागातून जपण्याची मोठी जबाबदारी आहे तर दुसरीकडे काही भागातील नामांकित चेहरे, विभागातील सामान्य नागरिक यांच्या समस्यांची वेळीच दखल घेऊन त्या सोडवायच्या आहेत. नागरी वसाहतीतील रस्ते, पाणी, ड्रेनेज सिस्टीमसारख्या सुविधांना प्राधान्य दिले जात आहेच, शिवाय झोपडपट्टी पुनर्वसन आणि आता प्रदूषणासारख्या समस्येवर जातीने लक्ष दिले जात आहे. विभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असल्यामुळे इतर सुविधांवर ताण निर्माण न होऊ देणे आणि प्रदूषणाची पातळी नियंत्रणात ठेवण्याचे जबाबदारी मोठी आहे. महत्त्वाचे म्हणजे यासाठी डीप क्लिनिंग मोहीम विभागात सुरू असून त्यावरही लक्ष ठेवले जात आहे.- विनायक विसपुते, सहायक आयुक्त, एच पश्चिम विभाग

शैक्षणिक संस्था : धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, हंसराज मोरारजी हायस्कूल, आर एन पोदार स्कुल, केंद्रीय विद्यालय (कोळीवाडा), रिझवी कॉलेज, नॅशनल कॉलेज

पर्यटनस्थळे : वांद्रे बॅण्डस्टँन्ड, माउंट मेरी चर्च, वांद्रे किल्ला, जॉगर्स पार्क, जरीमरी मंदिर, वांद्रे हेरिटेज रेल्वे स्थानक

२ डिस्पेन्सरी :  भाभा हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल, जीएम नर्सिंग होम, अग्रवाल नर्सिंग होम 

Web Title: H West Ward Entrance to the western suburbs know all the information regarding western line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई