ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थांना बॅड टच आणि गुड टचचे मार्गदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 18:21 IST2020-12-20T18:21:17+5:302020-12-20T18:21:37+5:30
Guide students :जोगेश्वरी व गोरेगाव क्षेत्रातील ८६४ शाळांमधे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थांना बॅड टच आणि गुड टचचे मार्गदर्शन
मुंबई : ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून जोगेश्वरी आणि गोरेगाव मधील विद्यार्थांना आज 'बॅड टच आणि गुड टच' मार्गदर्शन दिले. यावेळी जोगेश्वरी व गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील ८६४ शाळांमधे विद्यार्थ्यांना या विषयावर मार्गदर्शनपर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शालेय विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यामधील फरक समजावून देण्यासाठी पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि युवासेना कार्यकारीणी सदस्य अंकित सुनिल प्रभु यांच्या मार्गर्शनाखाली विभाग क्रमांक ३ मधील विद्यार्थ्यांसाठी शिबिराचे निरोजन करण्यात आले.
त्या नुसार पहिल्या टप्प्यात दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील ३१४ शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी 'गुड टच अँड बॅड टच' अर्थात 'चांगला स्पर्श व वाईट स्पर्श ' या महत्त्वाच्या विषयावर ऑनलाईन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आता दुसऱ्या टप्प्यात जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील व गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील शालेय मुलांसाठी आणि पालकांसाठी 'गुड टच अँड बॅड टच' अर्थात 'चांगला स्पर्श व वाईट स्पर्श ' या महत्त्वाच्या विषयावर ऑनलाईन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराला वरिष्ठ शिक्षिका अनघा साळकर यांनी मार्गर्शन केले. तर हे शिबिर यशस्वी करण्यासाठी युवाविभाग अधिकारी अमित पेडणेकर, रोहन शिंदे, प्रशांत मानकर यांच्या सह सर्व युवा सैनिकांनी विशेष मेहनत घेतली.