शिक्षकांचे वेतन रखडल्याचा निषेध नोंदवण्यासाठी शिक्षणमंत्र्यांच्या घराजवळ उभारली काळी गुढी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 10:50 IST2018-03-18T10:50:06+5:302018-03-18T10:50:06+5:30
मुंबईतील २७ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखवडणाऱ्या शिक्षण विभागाचा निषेध करण्यासाठी आज सकाळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बंगल्यात घुसून काळी गुढी उभारली.

शिक्षकांचे वेतन रखडल्याचा निषेध नोंदवण्यासाठी शिक्षणमंत्र्यांच्या घराजवळ उभारली काळी गुढी
मुंबई - मुंबईतील २७ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखवडणाऱ्या शिक्षण विभागाचा निषेध करण्यासाठी आज सकाळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बंगल्यात घुसून काळी गुढी उभारली. शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यात घुसून ही काळी गुढी उभारली.
शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक परिषदेचे पदाधिकारी सुभाष अंभोरे, बी डी घेरडे, प्रा. नरेंद्र पाठक व अन्य कार्यकर्त्यांसह आज सकाळीच विनोद तावडे यांच्या बंगल्यात घुसून मुख्य दरवाज्यात काळी गुढी उभारून आपला निषेध व्यक्त केला व तावडेंकडे काळी गुढी सुपूर्द केली.