संपूर्ण महिला कर्मचारीवर्ग असलेल्या माटुंगा स्थानकातील सर्वांचा सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 07:17 PM2021-06-17T19:17:42+5:302021-06-17T19:18:57+5:30

दिले २५ हजार रुपयांचे गट पारितोषिक; यापूर्वी झाली होती स्थानकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद 

Greetings to all at Matunga station with the entire female staff | संपूर्ण महिला कर्मचारीवर्ग असलेल्या माटुंगा स्थानकातील सर्वांचा सत्कार

संपूर्ण महिला कर्मचारीवर्ग असलेल्या माटुंगा स्थानकातील सर्वांचा सत्कार

Next
ठळक मुद्देदिले २५ हजार रुपयांचे गट पारितोषिक यापूर्वी झाली होती स्थानकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद 

माटुंगा स्थानक येथील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्षा (सीआरडब्ल्यूडब्ल्यू) तनुजा कंसल यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आला. त्यांनी कर्मचार्‍यांना २५,००० रुपये गट पुरस्कार आणि प्रशंसनीय काम केलेल्या दोन पॉईंट्सवुमनना २,५०० रूपयांचा वैयक्तिक पुरस्कारही दिला.

जुलै २०१७ मध्ये माटुंगा रेल्वे स्थानक हे  भारतीय रेल्वेतील सर्व महिला कर्मचारी असलेले पहिले स्थानक झाले आणि २०१८ मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली. स्थानक व्यवस्थापक, आरपीएफ, पॉईंट्स व्यक्ती, तिकीट तपासणी करणारे कर्मचारी, सफाई कर्माचारी यांच्यासह ३५ महिला कर्मचारी येथे कार्यरत आहेत.

यावेळी सीआरडब्ल्यूडब्ल्यूओचे कार्यकारी समिती सदस्य उपस्थित होते. कंसल यांनी कर्मचार्‍यांशी स्वतंत्रपणे संवाद साधला आणि त्यांना त्यांचे कर्तव्य बजावताना येणाऱ्या आव्हानांची माहिती घेतली व त्यांना प्रोत्साहन दिले. स्त्रियांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कल्याणासाठी स्वत:चे सर्व निर्णय घेण्यास हे सर्वोत्कृष्ट वातावरण असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Greetings to all at Matunga station with the entire female staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app