खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा शुल्कवाढीचा आलेख चढाच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 06:10 AM2020-02-16T06:10:13+5:302020-02-16T06:10:20+5:30

यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी १० ते १५ टक्के शुल्कवाढ प्रस्तावित, चार वर्षांत किमान दोन लाख ते कमाल सहा लाख रुपये वाढले

Graph of fee hike for private medical colleges | खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा शुल्कवाढीचा आलेख चढाच

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा शुल्कवाढीचा आलेख चढाच

googlenewsNext

मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयांचे शुल्क गेल्या वर्षी वाढल्यानंतर यंदा खासगी महाविद्यालयांच्या शुल्कात साधारण १० ते १३ टक्क्यांदरम्यान शुल्कवाढ प्रस्तावित आहे. शुल्क नियंत्रण समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत महाविद्यालयांनी प्रस्तावित केलेल्या या शुल्कवाढीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी मागील वर्षापेक्षा यंदाच्या शुल्कामध्ये जास्त वाढ प्रस्तावित केल्याचे दिसून आले आहे. ती मान्य झाल्यास विद्यार्थी, पालकांच्या खिशाला चांगलाच भुर्दंड बसेल.

२०२०-२१ वर्षासाठी शुल्क नियंत्रण समितीकडून खासगी वैद्यकीय महाविद्यालयांकडून शुल्क निश्चितीसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यासाठीच्या बैठकीत शहरातील के. जे. सोमय्या वैद्यकीय महाविद्यालयासारख्या महाविद्यालयाने आपल्या शुल्कात १०.८ टक्के वाढ प्रस्तावित केली आहे. मागील वर्षी या महाविद्यालयाच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाचे शुल्क ९ लाख २५ हजार इतके होते. यंदा ते १० लाख २५ हजार इतके प्रस्तावित करण्यात आले
आहे.
याचप्रमाणे राज्यातील इतर महत्त्वाच्या वैद्यकीय महाविद्यालयांनीही आपल्या शुल्कात वाढ सूचविली आहे. तर, पालकांच्या तक्रारीची दखल घेत पालघरमधील वेदांता वैद्यकीय महाविद्यालय आणि सांगलीतील प्रकाश इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स आणि रिसर्च या संस्थांच्या शुल्कवाढीला एफआरएकडून स्थगिती देण्यात आली आहे.
एखादा अपवाद वगळता राज्यातील सर्व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे पदवी अभ्यासक्रमाचे शुल्क यंदाही वाढले आहे. यंदाची १० ते १५ टक्के वाढ म्हणजे प्रत्यक्ष रकमेचा हिशेब केल्यास महाविद्यालयांचे प्रत्येक वर्र्षाचे शुल्क लाख ते दीड लाखाने वाढेल. शुल्काचा गेल्या चार वर्षांचा आढावा घेतल्यास चार वर्षांत किमान दोन लाख ते कमाल सहा लाख रुपये प्रत्येक वर्षासाठी अशी वाढ झाली आहे. या वाढत्या शुल्कवाढीबद्दल पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

शुल्काचा चढता आलेख
महाविद्यालय गेल्या वर्षीचे यंदाचे प्रस्तावित प्र्रस्तावित
शुल्क (रुपये) शुल्क (रुपये) वाढ
के. जे. सोमय्या वैद्यकीय महाविद्यालय, सायन ९,२५,००० १०,२५,००० १०. ८ %
तेरणा वैद्यकीय महाविद्यालय, नवी मुंबई ७,००,००० प्रस्तावित नाही ०
काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय, पुणे १२,६०,००० १३,०,००० ६. ३ %
एन.के.पी. साळवे महाविद्यालय, नागपूर ९,२३,००० ९,९८,००० ०. ८ %

Web Title: Graph of fee hike for private medical colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.