सोलापूरमध्ये होणाऱ्या टेरी टॉवेल प्रदर्शनासाठी उत्पादकांना अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 01:28 AM2019-09-20T01:28:56+5:302019-09-20T01:29:01+5:30

टेरी टॉवेल आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी होणा-या उत्पादकांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळातर्फे प्रत्येकी ३0 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

Grants to Producers for Terry Towel Exhibition in Solapur | सोलापूरमध्ये होणाऱ्या टेरी टॉवेल प्रदर्शनासाठी उत्पादकांना अनुदान

सोलापूरमध्ये होणाऱ्या टेरी टॉवेल प्रदर्शनासाठी उत्पादकांना अनुदान

Next

मुंबई : सोलापूर येथे २५ ते २७ सप्टेंबर रोजी होणाºया व्हायब्रंट टेरी टॉवेल आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी होणा-या उत्पादकांना केंद्र
सरकारच्या राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळातर्फे प्रत्येकी ३0 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. तसे पत्र महामंडळाने पाठविले असल्याची माहिती प्रदर्शनाच्या आयोजकांनी येथे दिली. मात्र या अनुदानासाठी उत्पादकांना आयोजकांशी संपर्क साधून अर्ज करावा लागणार आहे.
या प्रदर्शनात देश-विदेशांतील आयात-निर्यातदार, खरेदीदार, पर्यटक, ग्राहक तसेच अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, पोलंड, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, युगांडा, केनिया, फ्रान्स यांसह इतर अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनास येणाºया परदेशी ग्राहकांची राहण्याची मोफत व्यवस्था करण्यात येईल, असे टेक्स्टाइल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष राजेश गोस्की यांनी सांगितले.
>निर्यात शुल्क कमी करा
भारतातून युरोपात जाणाºया या मालावर सध्या १0 टक्के निर्यात शुल्क आकारण्यात येते. त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांना महागड्या दराने तो घ्यावा लागतो.
वस्त्रोद्योगात गेली तीन वर्षे मंदीचे वातावरण असल्याने हे शुल्क रद्द करण्यात यावे, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करणार असल्याचेही गोस्की म्हणाले.

Web Title: Grants to Producers for Terry Towel Exhibition in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.