Join us  

''राज्यपालांनी भाजपाकडे बहुमताची खात्री करायला हवी''

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 3:41 AM

राज्यपालांनी भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे की नाही याची खात्री करून घ्यायला हवी,

मुंबई : राज्यपालांनी भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे की नाही याची खात्री करून घ्यायला हवी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. जी प्रक्रिया आता सुरू झाली. ती अगोदर होवू शकत होती, असेही मलिक म्हणाले. घोडेबाजार सुरू होऊ नये यासाठी राज्यपालांनी लक्ष दिले पाहिजे. भाजपची सत्ता स्थापन झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पटलावर भाजपच्या विरोधात मतदान करेल. पटलावर सरकार पडल्यानंतर शिवसेनेने त्यांच्याविरोधात मतदान केलेआणि पटलावर सरकार पडले तर पर्यायी सरकार निर्माण करण्याबाबत पक्ष विचार करू शकतो, असेही मलिक यांनी स्पष्ट केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक मुंबईत १२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केली आहे. बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019भाजपाराष्ट्रवादी काँग्रेस