Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी केली स्वाक्षरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 21:13 IST

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने पारित झालेल्या मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपाल विद्यासागर राव यांनी आज स्वाक्षरी केली.

मुंबई -  विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने पारित झालेल्या मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपाल विद्यासागर राव यांनी आज स्वाक्षरी केली. त्यामुळे मराठा आरक्षण विधेयकाचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या झेंड्याखाली मराठा समाजाने काढलेले लाखोंचे मोर्चे आणि कायदेशीर व राजकीय लढाईनंतर अखेर गुरुवारी मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात एकमताने संमत झाले होते. बहुचर्चित मराठा आरक्षण विधेयक गुरुवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले होते. यावेळी दोन्ही सभागृहात एकमताने मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर, सभागृहात सर्वपक्षीय आमदारांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आज पूर्णत्वास गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभ पटलावर मांडलं. मराठा समाज आरक्षण विधेयक 2018 या विधेयकास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसकडून एकमताने मंजुरी दिली. त्यानंतर, अजित पवार यांनीही या विधेयकास एकमताने मंजुरी देत पाठिंबा देत असल्याचं म्हटलं. या विधेयकात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. तर, मराठा समाजाचा SEBC प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :मराठा आरक्षणमहाराष्ट्र