‘राज्यपाल कोश्यारी यांचे जीवन राष्ट्रसेवेला समर्पित’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 10:16 AM2022-09-22T10:16:39+5:302022-09-22T10:17:37+5:30

कोविंद यांच्या हस्ते ‘भगतसिंह कोश्यारी : अ सोल डेडिकेटेड टू द नेशन’ या पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

'Governor Koshyari's life dedicated to national service', ramnath kovind | ‘राज्यपाल कोश्यारी यांचे जीवन राष्ट्रसेवेला समर्पित’

‘राज्यपाल कोश्यारी यांचे जीवन राष्ट्रसेवेला समर्पित’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तीन वर्षांच्या कार्यकाळातील दोन वर्षे कोरोना असूनही राज्यभर अविश्रांत भ्रमण करणारे, मराठी भाषा शिकून जनसामान्यांशी संवाद साधणारे व राजकारणात राहून साधेपणा जपणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जीवन राष्ट्रसेवेला समर्पित आहे. त्यांच्यावरील पुस्तक हे मानवी मूल्ये, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा व साधेपणाचे संकलन आहे, असे उद्गार माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी काढले.

कोविंद यांच्या हस्ते ‘भगतसिंह कोश्यारी : अ सोल डेडिकेटेड टू द नेशन’ या पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. सोहळ्याला सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुस्तकाचे लेखक डॉ. तुषार कांती बॅनर्जी उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले, देवेंद्र फडणवीस देशासाठी आशेचे किरण आहेत. देवाची इच्छा असेल, तर देवेंद्र फडणवीस देशासाठी खूप मोठे कार्य करतील. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कोश्यारी हे ‘अ सोल डेडिकेटेड टू द नेशन’ या त्यांच्यावरील पुस्तकाच्या नावाप्रमाणेच देशाला समर्पित व्यक्तिमत्त्व आहे. लेखक तुषार कांती बॅनर्जी यांनी प्रास्ताविक केले, तर आनंद सिंह यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: 'Governor Koshyari's life dedicated to national service', ramnath kovind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.