मुंबई : महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजने अंतर्गत लाभ न मिळालेल्या ११ लाख १२ हजार शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामासाठी नवे पीक कर्ज देण्याचा आदेश राज्य शासनाने गुरुवारी काढला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या खरीप पीक आढावा बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता.शुक्रवारी लगेच त्यासंबंधीचा आदेश काढण्यात आला. हा आदेश राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांसाठी लागूअसेल. ज्यांना कर्जमाफी मिळाली नाही अशा शेतकºयांना थकबाकीदार न मानता नवे पीककर्ज दिले जाईल. कर्जाच्या थकबाकीची रक्कम शासनाकडून येणे बाकी, असे नमूद करून बँकांनी शेतकºयांनानव्याने कर्ज द्यावे, असे आदेशातम्हटले आहे.
शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचा शासनाचा आदेश निघाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 04:03 IST