Government Job: 'राज्यात सरकारी नोकरीची 2 लाख 3 हजार पदे रिक्त, लवकरच 1700 पदांसाठी भरती'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 10:07 PM2022-03-08T22:07:20+5:302022-03-08T22:09:01+5:30

राज्यात कोविडमुळे गेल्या 2 वर्षात शासकीय नोकरभरती झालीच नाही. त्यासंदर्भात नाना पटोलेंनी विचारलेल्या प्रश्नावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तर दिले आहे.

Government Job: Demand for 15 government jobs, recruitment for 1700 posts soon, Dattatray bharane on nana patole | Government Job: 'राज्यात सरकारी नोकरीची 2 लाख 3 हजार पदे रिक्त, लवकरच 1700 पदांसाठी भरती'

Government Job: 'राज्यात सरकारी नोकरीची 2 लाख 3 हजार पदे रिक्त, लवकरच 1700 पदांसाठी भरती'

googlenewsNext

मुंबई - राज्यात विविध विभागात लाखो पदे रिक्त असून मागील पाच सहा वर्षात सरकारी नोकर भरती झालेली नाही. महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असणारे बेरोजगार तरुण या भरतीची वाट पहात आहेत. विविध विभागातील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत विचारला होता. नाना पटोले यांच्या प्रश्नाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तर दिले. राज्यात भरतीसाठी १५ हजार ३९० पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले १ हजार ७०० पदांसाठी लवकरच जाहिराती प्रसिद्ध होणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

राज्यात कोविडमुळे गेल्या 2 वर्षात शासकीय नोकरभरती झालीच नाही. त्यासंदर्भात नाना पटोलेंनी विचारलेल्या प्रश्नावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तर दिले आहे. विविध शासकीय विभागांसाठी एकूण ११ लाख ५३ हजार ४२ पदे मंजूर असून त्यातील ८ लाख ७७ हजार ४० पदे भरलेली आहेत तर २ लाख ३ हजार ३०३ पदे रिक्त आहेत. राज्यात कोविड प्रादुर्भावाच्या दोन वर्षांच्या काळात पदांची भरती होऊ शकली नाही, मात्र आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवून भरती प्रक्रियेला गती दिली आहे. गृह, आरोग्य आदी विभागांना देखील पद भरतीची परवानगी दिली असून भरती प्रक्रिया ताबडतोब राबवली जाणार आहे, असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

शासकीय नोकऱ्यांमध्ये सरळसेवेच्या कोट्यातील भरती प्रक्रिया करण्यासाठी विविध विभागांकडून १५ हजार ३९० पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले असून ७३६६ पदांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे. या सहा महिन्यात साधारणतः ६ हजार २०० पदांकरिता ३०० जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून लवकरच एक हजार ७०० पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करुन भरती प्रक्रिया राबविण्यात येईल असे सांगून गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उत्तम काम केले असल्याचेही राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले.

काय म्हणाले होते नाना पटोले

विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, दरवर्षी 9 टक्के कर्मचारी सेवेतून निवृत्त होत असतात. आता जो रिक्त पदांचा आकडा सांगितलेला आहे तो कमी आहे. रिक्त पदांची संख्या यापेक्षा जास्त आहे. गेल्या पाच-सहा वर्षात एकही नोकर भरती झालेली नाही. विधानसभेतही कर्मचाऱ्यांचा मोठा बॅकलॉग आहे. कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नसेल तर आपण जनतेला सेवा कशी देणार ? मागील सरकारच्या काळातही नोकर भरती केली गेली नाही. ह्या रिक्त पदांची भरती लवकर होणे गरजेचे आहे. विविध विभागात रिक्त असलेल्या लाखो पदांची भरती करण्यासंदर्भात राज्य सरकारची काय योजना आहे? आणि किती दिवसात नोकर भऱती करणार, असे प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.  
 

Web Title: Government Job: Demand for 15 government jobs, recruitment for 1700 posts soon, Dattatray bharane on nana patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.