Join us

गोरेगाव ते मुलुंड अवघ्या २५ मिनिटांत!; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जुळ्या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 06:48 IST

प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्यामुळे गोरेगाव ते मुलुंड हे अंतर अवघ्या २५ मिनिटांत कापता येणार आहे

मुंबई :मुंबई महापालिकेतर्फे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना रस्ते मार्गाने जोडण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (लिंक रोड) प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, १३ जुलै रोजी होत आहे. प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्यामुळे गोरेगाव ते मुलुंड हे अंतर अवघ्या २५ मिनिटांत कापता येणार आहे. या प्रकल्पाविषयी...

या प्रकल्पांचीही पायाभरणी   नवी मुंबईतील तुर्भे येथे कल्याण यार्ड री-मॉडेलिंग आणि गती शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल. लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्म आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि ११ च्या विस्ताराचे उद्घाटन

प्रकल्पाची एकूण लांबी - १२.२० किलोमीटर

पहिल्या टप्प्यात नाहूर रेल्वे स्थानकाजवळील मार्गांसह सध्याच्या उड्डाणपुलाचे (आरओबी) रुंदीकरण. 

दुसऱ्या टप्प्यात ३० मीटर रुंद रस्त्याचे ४५.७० मीटरपर्यंत रुंदीकरण. 

टप्पा ३ (अ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरीचे बांधकाम. 

टप्पा ३ (ब) मध्ये गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे १.२२ किमी लांबीचा तिहेरी मार्गिका (३ बाय ३) असलेला पेटी बोगदा (कट अँड कव्हर) आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर लांबीचा जुळा बोगदा. 

चौथ्या टप्प्यात नाहूर ते ऐरोली टोल नाक्यापर्यंत पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडणारा प्रस्तावित द्विस्तरीय उड्डाणपूल तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि जीएमएलआरच्या जंक्शनवर वाहनांसाठी भुयारी मार्ग (व्हीयूपी) या कामांचा समावेश

फायदे काय?

 गोरेगाव-मुलुंड जोडमार्ग हा मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता. विशेषत: उत्तर मुंबईतील वाहतुकीस मोठा फायदा. या प्रकल्पामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांदरम्यान नवीन जोडरस्ता तयार होईल. त्यामुळे, वाहतूक कोंडीपासून दिलासा. या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगराला नवी मुंबई येथील नवीन प्रस्तावित विमानतळ आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाशी थेट जोडरस्ता उपलब्ध होणार.   नाशिक महामार्गावर जाणाऱ्या वाहनांनाही या प्रकल्पामुळे फायदा. जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्याच्या तुलनेत प्रवासाचे अंतर सुमारे ८.८० किलोमीटरने कमी होईल. गोरेगाव ते मुलुंडदरम्यान प्रवासाचा कालावधी ७५ मिनिटांवरून सुमारे २५ मिनिटे होईल. 

टॅग्स :मुंबईनरेंद्र मोदीमहाराष्ट्र सरकार