Join us

गोरेगावमध्ये मध्यरात्री भीषण आग, धर्मा प्रोडक्शनचं गोदाम जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 07:06 IST

गोरेगाव येथे कामा इंडस्ट्रीमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली. रात्री 2.30 च्या सुमारास करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला ही आग लागली.

मुंबई - गोरेगाव येथे कामा इंडस्ट्रीमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली. रात्री 2.30 च्या सुमारास करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला ही आग लागली. अग्निशमन दलाच्या 12 हून अधिक गाड्या सध्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. 5 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. आगीचं कारण अस्पष्ट असून घटनेची चौकशी केली जाईल अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

  

टॅग्स :आगकरण जोहर