गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:56 IST2026-04-06T13:55:01+5:302026-04-06T13:56:05+5:30

Mumbai Goregaon Crime : गोरेगावमधील दिंडोशी परिसरात रविवारी रात्री दोन गटांत तुफान राडा झाला. या हाणामारीत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

goregaon clash sparks tension bulldozer action in mumbais dindoshi area bmc marathi news | गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार

गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार

मुंबई

Mumbai Goregaon Crime : गोरेगावमधील दिंडोशी परिसरात रविवारी रात्री दोन गटांत तुफान राडा झाला. या हाणामारीत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत दोन्ही गटांना पांगवण्याचं काम केलं तसंच मध्यरात्री ८ जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींची घरं अनधिकृत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर आज सकाळी पोलीस बंदोबस्तात आरोपींच्या घरांवर थेट बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. 

दिंडोशी येथील संतोष नगर मार्केट परिसरात मरियम माता शोभा यात्रा दरम्यान राड्याचा प्रकार घडला होता. पोलिसांना राड्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून कारवाई केली गेली. तसंच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून ८ जणांना अटक केली गेली. कारवाईवेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करवा लागला. दोन गटांतील या राड्यात बजरंग दलाचे तीन कार्यकर्ते जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संतोष नगर परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

आरोपींच्या घरांवर कारवाई
संतोष नगर परिसरात अनधिकृत बांधकामांबाबत पालिकेकडे याआधीच तक्रारी आल्या होत्या. पण कालच्या राड्यानंतर अटक केले गेलेले आरोपी याच अनधिकृत घरांमध्ये वास्तव्याला असल्याचं निदर्शनास आल्यानंतर आज पालिकेनं पोलिसांच्या बंदोबस्तात परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवण्यास सुरुवात केली. 

किरीट सोमय्या हनुमान चालीसा पठण करणार
समोर आलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावर आज संध्याकाळी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत हनुमान चालीसाचे पठण करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मारहाण आणि अनधिकृत वस्त्यांमधील आरोपींची नावं पुढे आल्याने किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर पोलीस आता सोमय्यांच्या भूमिकेवर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Web Title : गोरेगांव में दंगा, पुलिस का बुलडोजर एक्शन; सोमैया करेंगे हनुमान चालीसा का पाठ

Web Summary : मुंबई के गोरेगांव में दंगे के बाद, पुलिस ने आठ लोगों को गिरफ्तार किया और उनके अवैध घरों को ध्वस्त कर दिया। भाजपा नेता किरीट सोमैया घटनास्थल पर हनुमान चालीसा का पाठ करेंगे। तनाव अधिक है, और पुलिस की उपस्थिति महत्वपूर्ण है।

Web Title : Goregaon Riots, Police Bulldozer Action; Somaiya to Recite Hanuman Chalisa

Web Summary : After a riot in Goregaon, Mumbai, police arrested eight individuals and demolished their illegal homes. BJP leader Kirit Somaiya will recite Hanuman Chalisa at the site. Tensions are high, and police presence is significant.