मुंबईतील भांडुपमध्ये भररस्त्यात गुंडाची २९ वार करून निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 10:23 IST2026-01-26T10:22:08+5:302026-01-26T10:23:44+5:30

Mumbai Crime News: भांडुपमधील तुळशेत पाडा येथे एकावर धारदार शस्त्रांनी तब्बल २९ वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवत पोलिस तपास सुरू आहे.

Goon brutally murdered by stabbing 29 times on a busy road in Bhandup, Mumbai | मुंबईतील भांडुपमध्ये भररस्त्यात गुंडाची २९ वार करून निर्घृण हत्या

मुंबईतील भांडुपमध्ये भररस्त्यात गुंडाची २९ वार करून निर्घृण हत्या

मुंबई - भांडुपमधील तुळशेत पाडा येथे एकावर धारदार शस्त्रांनी तब्बल २९ वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवत पोलिस तपास सुरू आहे. शंकरप्रसाद यादव ऊर्फ कल्ली असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भांडुप सोलापूर परिसरात राहणारा कल्ली हा अभिलेखावरील आहे.

भांडुपमध्ये खळबळ
रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या त्रिकुटाने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करत पसार झाले. या घटनेने भांडुपमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेची वर्दी लागताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कल्लीला रुग्णालयात नेले. तेथे त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.

३ दिवसांपूर्वी वाद
नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्याने अजित पवार गटातून उभ्या राहिलेल्या सज्जू मलिक याचा प्रचार केला होता. मिलिंद नगरमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळते असून पोलिस सर्व बाजूने तपास करत आहेत.

Web Title : मुंबई: भांडुप में गुंडे की 29 बार चाकू मारकर निर्मम हत्या

Web Summary : मुंबई के भांडुप में शंकरप्रसाद यादव की 29 बार चाकू मारकर हत्या कर दी गई। यह घटना तुलशेत पाड़ा के पास हुई। पुलिस को हाल ही के राजनीतिक अभियान और तीन दिन पहले हुए विवाद से संबंध होने का संदेह है।

Web Title : Mumbai: Gangster Brutally Murdered with 29 Stab Wounds in Bhandup

Web Summary : In Bhandup, Mumbai, Shankarprasad Yadav was brutally murdered with 29 stab wounds. The incident occurred near Tulshat Pada. Police are investigating a possible link to a recent political campaign and a prior dispute three days ago.