‘पेंग्विन कंत्राटदारांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 07:56 AM2021-09-06T07:56:00+5:302021-09-06T07:56:34+5:30

गेली तीन वर्षे देखभालीपोटी कंत्राटदाराला ११ कोटी दिले. देखभालीसाठी मुंबई पालिकेचे डॉक्टर नेमणे शक्य असतानाही निविदा काढून कंत्राटदार नेमण्याची गरज काय, असा प्रश्न रवी राजा यांनी केला आहे.

‘Golden laying hens for penguin contractors’, congress pdc | ‘पेंग्विन कंत्राटदारांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी’

‘पेंग्विन कंत्राटदारांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील वीर माता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन म्हणजे कंत्राटदारांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पेंग्विनच्या देखभाल खर्चावरून पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी टीकेची झोड उठवली आहे.
पालिकेने पुढील तीन वर्षांतील पेंग्विनच्या देखभालीसाठी १५ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. गेली तीन वर्षे देखभालीपोटी कंत्राटदाराला ११ कोटी दिले. देखभालीसाठी मुंबई पालिकेचे डॉक्टर नेमणे शक्य असतानाही निविदा काढून कंत्राटदार नेमण्याची गरज काय, असा प्रश्न रवी राजा यांनी केला आहे.

पुन्हा तीन वर्षांसाठी १५ कोटींचा खर्च 
१५ कोटींच्या सुधारित निविदेनुसार दरवर्षी पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यात पेंग्विन प्रदर्शनाची देखभाल व वातानुकूलन सुविधा, लाइफ सपोर्ट, इलेक्ट्रिकल सिस्टम, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा आणि पेंग्विनसाठी मासे, अन्न पुरवण्यासाठी खर्च आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे पेंग्विन खरेदीसाठी आणि कक्षासाठी एकूण २५ कोटींचा खर्च झाला होता. त्यानंतर ३ वर्षांच्या देखभालीसाठी ११ कोटी खर्च झाले. त्यानंतर आता पुन्हा पुढच्या तीन वर्षांसाठी १५ कोटी खर्च अपेक्षित आहे.

Web Title: ‘Golden laying hens for penguin contractors’, congress pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.