मुंबई विमानतळावर पकडले ४ कोटींचे सोने, १२ प्रकरणांत सीमा शुल्क विभागाची कारवाई
By मनोज गडनीस | Updated: May 8, 2024 17:44 IST2024-05-08T17:44:23+5:302024-05-08T17:44:36+5:30
एकूण १२ प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली असून या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४ कोटी ५ लाख रुपये इतकी आहे.

मुंबई विमानतळावर पकडले ४ कोटींचे सोने, १२ प्रकरणांत सीमा शुल्क विभागाची कारवाई
मुंबई - गेल्या तीन दिवसांत मुंबईविमानतळावर कार्यरत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण ६ किलो ३९ ग्रॅम सोने जप्त केले आहे. एकूण १२ प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली असून या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४ कोटी ५ लाख रुपये इतकी आहे.
दुबई, मस्कत, जेद्दा, कुवेत, शारजा येथून मुंबईत दाखल झालेल्या प्रवाशांकडून हे तस्करीचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. यापैकी काही प्रवाशांनी परिधान केलेल्या कपड्यांमध्ये हे सोने लपवले होते तर एका प्रकरणात एका आरोपीने हे सोने शरीरात लपविल्याचे देखील आढळून आले. एका प्रवाशाच्या ट्रॉलीबॅगमध्ये तयार करण्यात आलेल्या चोर कप्प्यांत सोने लपविल्याचे आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या सोन्यामध्ये सोन्याची पेस्ट, सोन्याची पावडर यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. तर एका प्रकरणात सोन्याचे दागिने देखील पकडण्यात आले आहेत.