सीमाशुल्क अधिकाऱ्यांची मोठी कारवाई; मुंबई एअरपोर्टवर तब्बल 61 किलो सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 09:03 PM2022-11-13T21:03:51+5:302022-11-13T21:05:01+5:30

या कारवाईत सोने तस्करी करणाऱ्या सात जणांना अटक करण्यात आली आहे.

gold smuggling mumbai airport A major crackdown by customs officials; 61 kg gold seized at Mumbai airport | सीमाशुल्क अधिकाऱ्यांची मोठी कारवाई; मुंबई एअरपोर्टवर तब्बल 61 किलो सोने जप्त

सीमाशुल्क अधिकाऱ्यांची मोठी कारवाई; मुंबई एअरपोर्टवर तब्बल 61 किलो सोने जप्त

Next

मुंबई:मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकार्‍यांनी एका दिवसात केलेल्या विविध कारवाईत 32 कोटी रुपयांचे 61 किलो सोने जप्त केले आहे. ही एका दिवसात विमानतळावर केलेली सर्वात मोठी कारवाई आहे. शुक्रवारी सोने जप्त करण्यात आले असून, दोन महिलांसह सात प्रवाशांना अटक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई विमानतळावर एका दिवसात कस्टम्सने जप्त केलेले हे सर्वाधिक सोने असल्याचा दावा त्यांनी केला. पहिल्या कारवाईत टांझानियाहून परतणाऱ्या चार भारतीयांकडून एक किलो सोने जप्त करण्यात आले. हे सोने खास डिझाइन केलेल्या एका पट्ट्यात लपवून ठेवण्यात आले होते. त्याच्याकडून 28.17 कोटी रुपये किमतीचे 53 किलो UAE निर्मित सोन्याचे बारही जप्त करण्यात आल्याचे त्याने सांगितले.

याशिवाय, दुबईहून आलेल्या तीन प्रवाशांकडून कस्टम अधिकाऱ्यांनी 3.88 कोटी रुपये किमतीचे 8 किलो सोने जप्त केले. तिन्ही प्रवाशांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 11 नोव्हेंबर रोजी मुंबई विमानतळ कस्टमने एकूण 32 कोटी रुपयांचे 61 किलो सोने जप्त केले आणि दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सात प्रवाशांना अटक केली. 
 

Web Title: gold smuggling mumbai airport A major crackdown by customs officials; 61 kg gold seized at Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.