विमानतळावर १० कोटींच्या सोने तस्करीचा डाव उधळला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 06:04 AM2019-06-17T06:04:38+5:302019-06-17T06:04:57+5:30

डीआयआरच्या मुंबई विभागाची कारवाई; ३२ किलो २८७ ग्रॅम सोने हस्तगत

Gold smuggled worth Rs 10 crore at the airport | विमानतळावर १० कोटींच्या सोने तस्करीचा डाव उधळला

विमानतळावर १० कोटींच्या सोने तस्करीचा डाव उधळला

Next

मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर महासंचालनालयाची (डीआयआर) नजर चुकविण्यासाठी देशांतर्गत एअरपोर्टवरून कुरिअरमार्फत दहा कोटींचे सोने तस्करी करण्याचा डाव शनिवारी हाणून पाडण्यात आला. डीआयआरच्या मुंबई विभागाने ही कारवाई केली असून, चौकशीत शहरातील ८ कुरिअर कंपन्याची नावे उघड झाली आहेत. त्यानुसार, या सर्वांवर आता कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

देशांतर्गत विमानतळावर मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी केली जाणार असल्याची माहिती डीआयआरच्या वरिष्ठांना मिळाली होती. त्यानुसार, शनिवारी डीआयआरच्या मुंबई विभागाने सांताक्रुझ डोमेस्टीक विमानतळावर काँकोर एअर लिमिटेड कंपनी या एअर कार्गोचे काम पाहणाºया कंपनीकडून १२ पार्सल हस्तगत केली. या पार्सलची पाहणी केली असता, त्यात सुमारे ३२ किलो २८७ ग्रॅम सोने त्यांना सापडले. हे सोने काळबादेवी परिसरात असलेल्या ८ कुरिअर कंपन्यांमार्फत झवेरी बाजार, वांद्रे, गोरेगाव, मालाड आणि अन्य ठिकाणी असलेल्या सोने व्यापाऱ्यांकडे पोहोचविले जात असल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाल्याचे सांगण्यात आले.

कशासाठी, तर मोठ्या कमिशनसाठी
सोने व्यापाºयांकडून जास्तीतजास्त कमिशन मिळविण्याच्या नादात या कार्गो कंपन्या महसूल चुकवत सोने तस्करीत सहभागी झाल्या असल्याचे समोर आले आहे.
मेसर्स सत्रावाला लॉजिस्टिक्स, मे. न्यू अशोक पार्सल अँड लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड, मे. अंबे एक्स्प्रेस लिमिटेड, मे. नेप्लॉग लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड, मे. भवानी लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड, मे. जय माता एअर सर्व्हिसेस आणि मे. योगिता लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड अशी सोन्याच्या तस्करीत सहभागी झालेल्या या कुरिअर कंपन्याची नावे असल्याचे सांगण्यात आले.

नवीन कार्यपद्धतीही फसली
डीआयआर निव्वळ आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पार्सलवरच लक्ष ठेऊन असते, असा गैरसमज या तस्करी करणाºया कंपन्यांचा झाला होता. तपास यंत्रणांच्या डोळ्यात धूळ फेकत सोन्याच्या सुरळीत तस्करीसाठी त्यांनी देशांतर्गत विमानतळावरून पार्सल पाठविण्याची नवीन कार्यपद्धती वापरली. पार्सलवर नाव असलेल्या लोकांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना ३० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती डीआरआयचे सहआयुक्त समीर वानखेडे यांनी दिली.

Web Title: Gold smuggled worth Rs 10 crore at the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं