ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो! मुंबई महापालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयाच्या कामाचे कौतुक, लतादिदींकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 07:31 IST2021-05-10T07:29:47+5:302021-05-10T07:31:07+5:30

मुंबई महानगरपालिकेने ज्या पद्धतीने कोरोनाशी लढा दिला आहे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आपल्या पत्रात दीदींनी नमूद केले आहे की, आपण महाराष्ट्रासाठी, दिवस-रात्र काम करीत आहात.

God bless you forever! Appreciation for the work of Mumbai Municipal Corporation's Jumbo covid Hospital, appreciation from Latadidi | ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो! मुंबई महापालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयाच्या कामाचे कौतुक, लतादिदींकडून कौतुक

ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो! मुंबई महापालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयाच्या कामाचे कौतुक, लतादिदींकडून कौतुक

मुंबई : आपण महाराष्ट्रासाठी, दिवस-रात्र काम करीत आहात. ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो, अशी मी मंगल कामना करते; असे म्हणत भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी वांद्रे-कुर्ला संकुल येथील मुंबई महापालिकेच्या जम्बाे कोविड रुग्णालयाच्या कामाचे कौतुक केले. हे कौतुक केवळ शाब्दिक नसून दीदींनी स्वहस्ताक्षरात वांद्रे-कुर्ला कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश डेरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेने ज्या पद्धतीने कोरोनाशी लढा दिला आहे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आपल्या पत्रात दीदींनी नमूद केले आहे की, आपण महाराष्ट्रासाठी, दिवस-रात्र काम करीत आहात. ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो, अशी मी मंगल कामना करते. या पत्रामुळे कर्मचाऱ्यांना रुग्णसेवा करण्याचे बळ मिळाले आहे, अशी भावना डेरे यांनी व्यक्त करीत दीदींचे आभार मानले. 
 

Web Title: God bless you forever! Appreciation for the work of Mumbai Municipal Corporation's Jumbo covid Hospital, appreciation from Latadidi