Join us

कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या जिल्ह्यात शेळी बाजाराचे विकेंद्रीकरण करावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 12:10 IST

सरकार मुस्लिम समाजातील ईद उल अझहा (बकरी ईद) या सणाच्या  सोपस्कारांना मोठ्या प्रमाणात परवानगी देण्यास अनुकूल नाही.

 

मुंबई: कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकार या वर्षी मुस्लिम समाजातील ईद उल अझहा(बकरी ईद) या सणाच्या  सोपस्कारांना मोठ्या प्रमाणात परवानगी देण्यास अनुकूल नाही. या संदर्भात जमात ए इस्लामी हिंद महाराष्ट्र चे अध्यक्ष रिझवान ऊर रहमान खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्या चे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिले आहे की महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी फक्त ९ जिल्हे कोरोणा मुळे अति प्रभावित झाले आहेत. बाकीच्या जिल्ह्यात कोरोणाचे प्रमाण कमी आहे. म्हणून अशा कमी प्रभावित भागात बकरा बाजाराला मान्यता मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

कोरोणाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ते सर्व संरक्षक उपाय करण्याची अट घालून ही परवानगी देण्यात यावी. रेडझोन मध्ये सुद्धा संरक्षणात्मक उपायांसह इतर आर्थिक घडामोडींना परवानगी देण्यात आली आहे. याप्रमाणे काही अतिरिक्त उपायांसाह बकरा बाजाराला परवानगी देण्यात यावी. या वर्षी  मुख्य शेळी बाजारातील गर्दी टाळण्यासाठी शहरातील इतर मोकळ्या ठिकाणी   त्याचे विकेंद्रीकरण करावे, तसेच या विकेंद्रित बाजाराच्या ठिकाणी  कम्युनिटी सेंटर स्थापित करून तेथेच कुर्बानी करण्याची अनुमती देण्यात यावी जेणेकरून मुख्य बाजारामध्ये होणारी गर्दी टाळता येऊ शकते. असेही रिझवान ऊर रहमान खान यांनी सुचविले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील वेगवेगळ्या खुल्या परिसरात तसेच क्रीडांगणे आणि इतर सोयीस्कर जागेत  तात्पुरत्या स्वरूपात बाजार भरवल्यास गर्दी होणार नाही.

प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनाला तेथील सर्व स्तरातील जबाबदार नागरिकांचे पाठबळ आहे. या संदर्भात कोरोना विषयी मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात यावीत,  अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसलॉकडाऊन अनलॉक