पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 06:24 IST2026-04-06T06:24:10+5:302026-04-06T06:24:48+5:30

कुठे तलाव आहे तर पाणी नाही, कुठे तलावात शेवाळ; तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स, तरी मृत्यू अन् दुखापतीच्या घटना, प्रशासकीय अनास्थेचे जागोजागी दर्शन

Go swimming... but at your own risk! Lifeguards at the pool, ambulances at the door, but still deaths | पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना

पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना

दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्या आणि शाळा-महाविद्यालयांच्याही परीक्षा संपत आल्या आहेत. त्यामुळे सुट्यांच्या काळात तरण तलावांमध्ये पोहण्यासाठी प्रवेश घेण्यास मुलांची गर्दी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर महामुंबईतील तरण तलावांची सद्यस्थिती काय आहे, याचा लोकमत चमूने घेतलेला आढावा.

लोकमत चमू, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/ठाणे/नवी मुंबई: उन्हाचा तडाखा वाढला की बहुतेकांची पावले जलतरण तलावांकडे वळतात. मात्र, महामुंबईतील महापालिकांचे जलतरण तलाव ‘सुविधा कमी आणि समस्या जास्त’ अशा विचित्र स्थितीत आहेत. कुठे कोट्यवधी खर्चून बांधलेले तलाव धूळ खात पडलेत, तर कुठे साध्या विम्याचे संरक्षणही पोहणाऱ्यांना मिळत नाही. एकीकडे खासगी तलावांची लूट तर दुसरीकडे प्रशासकीय अनास्थेमुळे पालिका तलावांत पोहण्याचे सामान्यांचे स्वप्न ‘पाण्यात’ गेले आहे.

भरमसाठ शुल्क घेणाऱ्या तलावांवर  मोठी गर्दी होत आहे, पण तेथील सुरक्षिततेचा प्रश्न कायम आहे. अनेक ठिकाणी जीवरक्षक व ॲब्युलन्स तैनात असूनही मृत्यू किंवा दुखापतींच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी  मृत्यू किंवा दुखापत झाल्यास विमा संरक्षणही नाही. त्यामुळे उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तरण तलावात आपल्या जबाबदारीवर उतरावे लागणार आहे.

महामुंबईतील काही तलाव दीर्घकाळ बंद

रायगड जिल्हा क्रीडा संकुलातील तलाव तीन वर्षांपासून बंद आहे. धक्कादायक म्हणजे जिल्ह्यातील तब्बल १० शासकीय तरणतलाव दीर्घकाळापासून कुलूपबंद आहेत. ‘कल्याण स्पोर्ट्स’मधील तलाव सहा महिन्यांपासून बंद असल्याने खेळाडूंचा सराव थांबला आहे. मुंब्र्यात तर हद्दच झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला तलाव दोन वर्षांपासून बंद आहे. तिथे शेवाळ साचले आहे. तो असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनल्याचे नागरिक सांगतात.

शुल्क, देखभालीवर नियंत्रणच नाही

जलतरण तलावामध्ये दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांचे पोस्टर्स सर्वत्र झळकत आहेत. काही खासगी तलावांमध्ये चांगल्या सुविधाही आहेत; पण त्यांचे शुल्क भरमसाठ असून ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. पालिकेच्या तरण तलावांचे शुल्क मासिक दीड-दोन हजारांच्या घरात आहे. खासगी जलतरण तलावांचे शुल्क व देखभालीवर महापालिका किंवा राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही.

Web Title : अपनी जिम्मेदारी पर तैरें: मुंबई में पूल सुरक्षा चिंताएँ बढ़ रही हैं

Web Summary : मुंबई के सार्वजनिक और निजी दोनों स्विमिंग पूल सुरक्षा समस्याओं का सामना कर रहे हैं। उच्च शुल्क, बीमा की कमी, बंद सुविधाएं और अपर्याप्त रखरखाव पूल को त्रस्त कर रहे हैं, फिर भी लाइफगार्ड और एम्बुलेंस मौजूद हैं। तैराक अपनी जिम्मेदारी पर प्रवेश कर रहे हैं।

Web Title : Swim at Your Own Risk: Pool Safety Concerns Rise in Mumbai

Web Summary : Mumbai's swimming pools, both public and private, face safety issues. High fees, lack of insurance, closed facilities, and inadequate maintenance plague the pools despite lifeguards and ambulances. Swimmers are entering at their own risk.