Join us

ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठी काढली जागतिक निविदा; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 06:25 IST

काटकसरीने वापर व्हावा यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात आली असून, ती सर्व रुग्णालयांना पाठविण्यात आली आहे. 

मुंबई : राज्य सरकारने ऑक्सिजन, रेमडेसिविर उपलब्धतेसाठी जागतिक निविदा काढली आहे. त्याद्वारे ४० हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, १३२ पीएसए, २७ ऑक्सिजन टँक, २५ हजार मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन आणि १० लाख व्हायल्स रेमडेसिविरच्या या साहित्याची खरेदी करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात सध्या १६१५ मेट्रिक टन ऑक्सिजन वापरला जातो. त्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात आली असून, ती सर्व रुग्णालयांना पाठविण्यात आली आहे. 

राज्यात ऑक्सिजनच्या वापराबाबत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात आली असून, त्यानुसार रुग्णांना ऑक्सिजन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. - राजेश टोपे, आरोग्यमंत्री  

नंदुरबार जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन नर्स ही संकल्पना राबविण्यात आली. ५० रुग्णांसाठी एक नर्स नेमून तिच्या माध्यमातून ऑक्सिजन वापरावर लक्ष ठेवले जाते. ही संकल्पना यशस्वी झाल्याचे दिसत असून अशा प्रकारचा प्रयोग अन्य रुग्णालयांनी राबवावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. 

टॅग्स :ऑक्सिजनराजेश टोपेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस