Join us

प्रत्येकाने एक रुपया द्या, वांद्रे पश्चिमेत अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल सुरू करू : आ. आशिष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 09:09 IST

आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि पुनर्विकासाच्या बाबतीतही आपण अनेक प्रकल्प हाती घेतले असून, ते यावेळी पूर्ण करू, असेही शेलार म्हणाले. ‘लोकमत’चे संपादक अतुल कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.

मुंबई : वांद्रे पश्चिम मतदारसंघात सर्वसामान्य रुग्णांसाठी कॅन्सर रुग्णालय सुरू करणार असून, त्यासाठी प्रत्येकाने फक्त एक रुपया द्यावा, अशी आपली संकल्पना असल्याचे मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेटीवेळी सांगितले.

    आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि पुनर्विकासाच्या बाबतीतही आपण अनेक प्रकल्प हाती घेतले असून, ते यावेळी पूर्ण करू, असेही शेलार म्हणाले. ‘लोकमत’चे संपादक अतुल कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.

मतदारसंघातील कोणत्या समस्येला प्राधान्य देऊन ती सोडविणार?

वांद्रे पश्चिमेत सेलिब्रिटी, उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि गरीब असे सर्वच लोक राहतात. झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता आणि पाण्याचा प्रश्न आहे. तर, उच्चभ्रू सोसायट्यांना रस्त्यांवरील कचऱ्याचा प्रश्न सतावत आहे. प्रत्येक मतदाराला  प्रसन्न आणि सुविधापूर्ण जीवनमानाचा अनुभव आला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्नशील असून गेल्या १० वर्षांत त्या दृष्टीने अनेक प्रयोग केले आहेत. कचरामुक्त मुंबई व त्याआधी कचरामुक्त मतदारसंघ हा माझा प्रयत्न असणार आहे. महापालिकेचे कर्मचारी सकाळी कचरा गोळा करतात. रस्ते झाडतात. मात्र सायंकाळी फेरीवाले व दुकानदारांमुळे पुन्हा कचरा होतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांची रात्रपाळी सुरू करण्याबाबत आपली पालिकेसोबत चर्चा सुरू असून जर त्यात धोरणात्मक बदल करावा लागला, तर त्यासाठीही आपण पाठपुरावा करणार आहोत.

विभागातील नागरिकांसाठी कशा प्रकारची आरोग्य सुविधा  आहे?

गरीब रुग्णांसाठी मतदारसंघात चार ठिकाणी डायलिसिसची सुविधा करण्याचा मानस आहे. यापूर्वीच विभागात पालिकेच्या माध्यमातून दोन डायग्नोस्टिक सेंटर सुरू केले असून तेथे एक्स-रेपासून सिटीस्कॅनपर्यंत सुविधा आहे. भाभा रुग्णालय अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड करत आहोत. आता विभागात कॅन्सर रुग्णालय सुरू करणार आहे. येथे आलेल्या रुग्णाला आणि त्याच्या नातेवाइकांना योग्य उपचार आणि राहण्यासाठी तसेच भोजनासाठी सुविधा उपलब्ध करून देणार आहोत.  मतदारसंघात प्राण्यांसाठी एक पशू दवाखाना आणि रुग्णालय सुरू करण्याचा मानस आहे.

... अशी ही मन की बात

नागरिकांना विविध योजनांची माहिती मिळत नाही. त्यासाठी उद्यानांच्या बाहेर काही डिजिटल फलक उभारणार आहोत. महिन्यातून एकदा नागरिकांशी यूट्यूबच्या माध्यमातून मन की बात करत संवाद साधून त्यांना अवगत करणार आहोत.

वाहतूककोंडी, झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यावर भर एस.व्ही. रोड आणि लिंकिंग रोडवर वाहतूककोंडीचा प्रश्न हा आहे. तो सो डवण्यासाठी आपण वांद्रे-वर्सोवा सी-लिंक करत आहोत. यानंतर ही समस्या निश्चितच संपुष्टात येईल. क्वार्टर रोड, बँड स्टँड येथे सी-लिंकला जोड रस्ता दिला आहे.मतदारसंघातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा प्रश्न आता जवळपास निकाली निघाला आहे. तर, झोपडपट्ट्यांच्या रखडलेल्या पुनर्वसनासाठी आपण आग्रही असून लवकरच आहे त्याजागी योग्य पुनर्वसन करू.

टॅग्स :आशीष शेलारभाजपा