नाट्यगृह पुर्नविकासाचा तपशील लेखी स्वरूपात द्या - विजय पाटकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 03:33 PM2023-11-30T15:33:40+5:302023-11-30T15:35:14+5:30

दामोदर हॅालच्या प्रवेशद्वारावर रंगकर्मींचे प्रदर्शन

Give details of theater redevelopment in writing - Vijay Patkar | नाट्यगृह पुर्नविकासाचा तपशील लेखी स्वरूपात द्या - विजय पाटकर

नाट्यगृह पुर्नविकासाचा तपशील लेखी स्वरूपात द्या - विजय पाटकर

मुंबई - गिरणगावातील सांस्कृतिक इतिहास आणि वारसा जमिनदोस्त करू पाहणाऱ्या प्रवृत्तींचा शांततापूर्ण जाहिर निषेध करत दामोदर हॅालच्या प्रवेशद्वारासमोर रंगकर्मींनी आंदोलन केले. या आंदोलनात मराठी नाट्यकर्मींसोबत दामोदर नाट्यगृहातील कर्मचारी आणि सहकारी मनोरंजन मंडळाने सहभाग घेतला. सकाळी अकराच्या सुमारास दामोदर हॅालच्या प्रवेशद्वाराजवळ रंगकर्मींसोबतच नाट्यरसिकही जमा झाले आणि घोषणा देत आंदोलन सुरू झाले. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष व अभिनेते विजय पाटकर, ज्यष्ठ अभिनेते उपेंद्र दाते, दिग्दर्शक हेमंत भालेकर, राजेश नर तसेच बरेच रंगकर्मी उपस्थित होते. 

यावेळी सर्व रंगकर्मींच्या मनातील खंत व्यक्त करत विजय पाटकर म्हणाले की, जिथून आमच्यासारख्या असंख्य कलाकारांची सुरुवात झाली त्या दामोदर हॅालच्या बाहेर आंदोलन करण्याची वेळ यावी यासारखे दुर्दैव नाही. तुम्ही शाळा बांधा, पण आमचे हे मंदिरही बांधून द्या. ते कुठे बांधले जाणार, क्षेत्रफळ किती देणार या सर्व गोष्टी लेखी स्वरूपात द्या. आम्हाला शाब्दिक आश्वासन नको. पत्र्याच्या शेडपासून अद्ययावत थिएटरपर्यंतचा दामोदर हॅालचा प्रवास पाहिलेल्या रंगकर्मींना हक्काची वास्तू द्या इतकीच माफक अपेक्षा असल्याचेही पाटकर म्हणाले. एखाद्या चित्रपटगृहाची नवीन इमारत सरकारी मान्यता मिळाल्याशिवाय बांधता येत नाही. असे असतानासुद्धा दामोदार हॅाल हा मराठी माणसासाठीचा रंगमंच नेस्तनाबूत करण्याची परवानगी कशी देण्यात आली असा थेट सवाल राजेश नर यांनी शासनाला केला आहे.

हेमंत भालेकर म्हणाले की, मनोरंजन नसेल तर तुम्ही सगळे मानसिक रुग्ण व्हाल. माणसांची यंत्रे बनवायची नसतील तर नाट्यगृहे सुरू राहिली पाहिजेत. सरकारने यात लक्ष घालून तातडीने दामोदर हॅाल संदर्भातील प्रश्न सोडवावा. १०० वर्षांपासूनची संस्था असूनही नाट्यगृहाबाबत कागदोपत्री काहीच देत नाही. मुख्य हॅाल किती आसनांचा असेल याचीही स्पष्टता नाही. मनपामधून आणलेल्या प्लॅनमध्ये साडे पाचशे आसनक्षमतेचे थिएटर आहे, ज्याचा नाटकाला फाहीच फायदा होणार नाही. निर्मात्यांनी किती रुपयांचे तिकिट ठेवायचे? १००० रुपये तिकिट ठेवल्यास या विभागात नाटक बघायला कोण येणार? त्यामुळे हा हॅाल भविष्यात कॅार्पोरेट सभांसाठी दिला जाईल अशी शक्यताही भालेकर यांनी वर्तवली आहे.
 

Web Title: Give details of theater redevelopment in writing - Vijay Patkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.