Join us

Maharashtra 10th 12th Result 2025: दहावी, बारावी पुरवणी परीक्षेत मुली सरस; मुंबईचा निकाल सर्वांत कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 10:23 IST

Maharashtra 10th 12th Supplementary Exam Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलैमध्ये घेतलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल मंगळवारी जाहीर केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलैमध्ये घेतलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल मंगळवारी जाहीर केला. त्यानुसार दहावीचे ३६.४८ %, तर बारावीचे ४३.६५ %विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

दहावीच्या ३९.३७ % मुली, तर बारावीच्या ४७.४७ % मुली उत्तीर्ण झाल्या. दोन्ही परीक्षांमध्ये मुलींनी सरस कामगिरी केली. मुंबई विभागाचा दहावीचा निकाल सर्वांत कमी, म्हणजे १९.४२%, तर बारावीचा निकाल ३४.५० % लागला आहे. 

प्रवेशासाठी विशेष फेरी

दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून लवकरच विशेष फेरीचे घेण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

 

टॅग्स :बारावी निकालदहावीचा निकालदहावी12वी परीक्षामहाराष्ट्र