Join us

गर्लफ्रेंडला मारहाण; अरमान कोहलीचा जामीन अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 15:31 IST

गर्लफ्रेंडला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता अरमान कोहली याचा जामीन अर्ज बुधवारी कोर्टाने फेटाळला आहे. त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

मुंबई : गर्लफ्रेंडला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता अरमान कोहली याचा जामीन अर्ज बुधवारी कोर्टाने फेटाळला आहे. त्याला कोर्टाने 26 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

अभिनेता अरमान कोहली याला गर्लफ्रेंड नीरु रंधवा हिला केल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी मंगळवारी (दि.12) लोणावळ्यातून अटक केली होती. त्यानंतर अरमान कोहली याने आपल्या सुटकेसाठी बांद्रा कोर्टात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर बुधवारी कोर्टात सुनावणी करण्यात आली. यावेळी कोर्टाने अरमान कोहली याचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्याला 26 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

3 जून रोजी अरमान कोहलीने आपल्याला मारहाण केल्याची तक्रार गर्लफ्रेंड नीरु रंधवा हिने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अरमान कोहली याला लोणावळ्यातून अटक केली होती. 

 

टॅग्स :अरमान कोहलीकरमणूकन्यायालयबॉलिवूडपोलिस