बालिकेला दाखवली पॉर्न क्लिप बसमधील घटना : ५५ वर्षांच्या आरोपीला पोक्सोखाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 13:09 IST2024-12-28T13:08:00+5:302024-12-28T13:09:50+5:30

आरोपीला 'पोक्सो' कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. 

Girl shown porn clip in bus incident 55 year old accused arrested under POCSO | बालिकेला दाखवली पॉर्न क्लिप बसमधील घटना : ५५ वर्षांच्या आरोपीला पोक्सोखाली अटक

बालिकेला दाखवली पॉर्न क्लिप बसमधील घटना : ५५ वर्षांच्या आरोपीला पोक्सोखाली अटक

मुंबई : बसमध्ये शेजारी बसलेल्या ७ वर्षांच्या बालिकेचा हात पकडून तिला एका ५५ वर्षांच्या प्रवाशाने मोबाइलवर पॉर्न व्हिडीओ दाखवल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी घडली. आरोपीला 'पोक्सो' कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. 

ही मुलगी आणि तिची आई बसमध्ये चढले तेव्हा गर्दी होती. आरोपीच्या आसानावरील एक प्रवासी उतरल्यानंतर तेथे तिच्या आईने तिला बसवले. बस परळ परिसरातून जात असताना आरोपीने मुलीचा हात पकडला आणि तिला जबरदस्तीने मोबाइलमधील पॉर्न व्हिडीओ दाखवला. मुलीकडे आईचे लक्ष जाताच तिने त्याला हटकले आणि मुलीला जवळ घेतले, तसेच अन्य प्रवाशांच्या मदतीने मुलीच्या आईने आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम ७४, ७५ आणि पोक्सोतील कलम १२ नुसार गुन्हा नोंदवत या आरोपीला अटक केली. पोलिसांनी त्याचा मोबाइल तपासला असता त्यात अश्लील व्हिडीओ आढळले. आरोपी खासगी कंपनीत नोकरी करत आहे.

वॉचमनचे मुलीशी अश्लील वर्तन... 

पश्चिम उपनगरात ९ वर्षांच्या मुलीचा सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने विनयभंग केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना २३ डिसेंबरला संध्याकाळी एका संकुलात घडली. ही मुलगी खेळून घरी येत असताना सुरक्षारक्षकाने तिच्याशी अश्लील वर्तन केले. तिने हा प्रकार पालकांना सांगताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. आरोपीला अटक केली आहे.

Web Title: Girl shown porn clip in bus incident 55 year old accused arrested under POCSO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.