Girgaum experienced heavy rains | गिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप

गिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप

मुंबई : ज्या गिरगावला पूर कधी माहीत नव्हता. चिराबाजार सोडले तरी पावसाचे फार काही पाणी साठल्याचे गिरगावकरांनी कधी पाहिले नाही. गिरगावकरांना येथे आजन्मी तरी पूर आल्याचे आठवत नाही. प्रत्यक्षात सोडा स्वप्नातदेखील गिरगावात कधी पावसाचे पाणी साठल्याचे कोणी पाहिले नाही. पाहण्यात काय ऐकीवातही नाही. अशा गिरगावातच गेल्या चार दिवसांपैकी बुधवारी पडलेल्या पावसाने धिंगाणा घातला; आणि गिरगावकरांचे मोठे नुकसान झाले.

गिरगावमध्ये आलेल्या पुराची स्थानिकांनी कधी कल्पनादेखील केली नव्हती. मात्र एवढा पाऊस पडला की कधी नव्हे ते गिरगावकरांनी पूर पाहिला, अशी प्रतिक्रिया येथील स्थानिकांनी ‘लोकमत’ला दिली. गिरगावकरांचे या पुरात मोठे नुकसान झाले. कुणाच्या घरावरची कौले उडाली. पत्रे उडाले. डांबर शीट उडाले. चाळीमध्ये तळमजल्यावरील घरात पाणी शिरले. एका पिढीपेक्षा अधिक पिढीने पाहिलेली दोन मोठी झाडे पडली. परिणामी, केवळ मुंबईच नाहीतर, जगातील सर्व आधुनिक शहरे त्यांच्या निसर्गविरोधी वर्तनामुळे व विकासामुळे बुडत आहेत. नागपुरातही तेच घडत आहे. याला तापमानवाढीने अत्यंत विध्वंसक परिमाण दिले आहे. २६ जुलैला मुंबई त्यानंतर २८ आॅगस्टला न्यू आॅर्लीन्स व त्यापाठोपाठ शांघाय २००५ मध्ये बुडाले.
मात्र आपण समस्येकडे लक्ष
देत नाही, अशी खंत व्यक्त केली जात आहे.

महापुराकडे वाटचाल
१७८४ सालात वरळी व गिरगाव ही बेटे जोडणाऱ्या सागरातील पहिल्या भरावाचे (रेसकोर्सपासून पायधुणीपर्यंत) काम सुरू झाले. हा विकास हीच दुर्घटना होती. या प्रत्येक भरावात व त्यासाठी दगड - माती मिळविण्यासाठी केलेल्या डोंगराच्या नाशामुळे सागरातील व डोंगरावरील असाधारण जंगल व जैवविविधता नष्ट झाली. त्याचबरोबर महापुराकडे वाटचाल होत राहिली.

भरती रेषा जमिनीच्या दिशेने
मुंबईच्या बहुतेक भागांतील पर्जन्य व मलनिस्सारण यंत्रणा सन १९३० व ४० च्या दरम्यान बांधली गेली. या यंत्रणांच्या, पाणी बाहेर सोडणाºया मुखांपासून काही अंतरावर सर्वांत मोठ्या भरतीच्या पाण्याची रेषा होती. तरच पाणी सागरात सोडले जाणे शक्य होते. परंतु नंतर विकासाच्या नशेत सागरात भराव होतच राहिले. या यंत्रणा बांधल्यानंतरच्या प्रत्येक भरावाने भरती रेषा जमिनीच्या दिशेने ढकलली गेली व पुराच्या दिशेने वाटचाल झाली.


1बुधवारी झालेल्या पावसाने गिरगावकरांचे अक्षरश: कंबरडे मोडले. गिरगाव येथील चाळींसह व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले. येथे पाच ते सहा फूट पाणी साचल्याने दुकानांत, घरात पाणी शिरले होते. भांड्यांची दुकाने, वाद्यांच्या दुकानांसह उर्वरित अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. व्यापारी वर्गाव्यतिरिक्त गिरगाव येथील रहिवासी क्षेत्रातदेखील मोठ्या प्रमाणात घरांत पाणी शिरले होते. त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक फटका बसला आहे.

2गिरगावसह गोलमंदिर, खेरवाडी, भेंडीबाजार आणि नळबाजार येथील दुकानांत पावसाचे पाणी शिरले. परिणामी, दुकानदारांचे शिवाय तळमजल्यावर राहत असलेल्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले. येथे पाच ते सहा फूट पाणी साचले होते. स्थानिकांनी, दुकानदारांनी गटारात सळ्या, काठ्या टाकून फ्लो वाढविण्याचा प्रयत्न केला. गटारेदेखील तुंबल्याने दुकानांत पाणी शिरले. वाद्यांची दुकाने, धान्याची दुकाने, भांड्यांची दुकाने अशा अनेक दुकानांचे नुकसान झाले. या व्यतिरिक्त गिरगावसह लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर उभी करण्यात आलेली वाहने साचलेल्या पाण्यात तरंगत होती. विशेषत: दुचाकी तर खाली पडल्या होत्या आणि पाण्याच्या लाटांसोबत इकडेतिकडे वाहत असल्याचे चित्र होते.

तिन्ही नद्यांचे पाणी माहिम खाडीत

उत्तरेकडील बोरीवलीच्या जंगलातील तुळशी, विहार व पवई या तीनही तलावांच्या पाणलोट क्षेत्रापासून ते दक्षिणेकडे एल्फिन्स्टन, लोअर परळपर्यंत व पूर्वेला घाटकोपरच्या तीन खाडी टेकड्यांपासून ते पश्चिमेस सागराला खेटून असलेल्या आर्य समाज, सांताक्रुझ भागांपर्यंतचे पावसाचे पाणी मिठी नदी व तिच्या उपनद्यांतून माहिमच्या खाडीत येते.

या खाडीची सागराचे व पावसाचे पाणी साठवण्याची अर्धी क्षमता सुमारे १००० एकर भराव (त्यापैकी सुमारे ७०० एकर मॅनग्रोव्ह गाडून) करून नष्ट केली गेली. माहिमच्या उपसागरात येणाºया प्रभादेवी, दादर - शिवाजी पार्क, माहिम व वांद्रे भागांतील पाण्यासह वरळी व वांद्रे या भूशिरांमधील भागांतून अरबी समुद्रात शिरते. या पाण्याला सी-लिंक प्रकल्प अडवतो. हे सर्व विकासाच्या नावे झाले.

च्१९६४ च्या विकास आराखड्यातील गृहीतकाप्रमाणे अर्धा पाऊस जमिनीकडून शोषला जाईल. मात्र मुंबईच्या काँक्रिटीकरणामुळे हे गृहीतक मोडले गेले आहे.
च्मुंबईतील बहुतांश क्षेत्राचे १०० % काँक्रिटीकरण झाले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी पृष्ठभागावर साठते किंवा वाहते. जमिनीत मुरत नाही. पूर येतो.
च्बर्फ वितळल्यामुळे सागराच्या पातळीत वाढ होऊन मुंबई १५-२० वर्षांत पाण्याखाली जाणार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Girgaum experienced heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.