मेट्रो-२ ए मार्गिकेसाठी शिंपोली येथे गर्डर टाकण्याचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 07:26 PM2020-06-02T19:26:49+5:302020-06-02T19:27:25+5:30

दहिसर पश्चिम ते डीएन नगर या मेट्रो- २ ए मार्गिकेच्या कामाला एमएमआरडीएने गती दिली आहे.

Girder laying work completed for Metro-2A line at Shimpoli | मेट्रो-२ ए मार्गिकेसाठी शिंपोली येथे गर्डर टाकण्याचे काम पूर्ण

मेट्रो-२ ए मार्गिकेसाठी शिंपोली येथे गर्डर टाकण्याचे काम पूर्ण

Next

 

मुंबई : दहिसर पश्चिम ते डीएन नगर या मेट्रो- २ ए मार्गिकेच्या कामाला एमएमआरडीएने गती दिली आहे. या संपूर्ण उन्नत मार्गिकच्या कामासाठी शिंपोली येथील नाल्यावर गर्डर टाकण्याचे कठीण काम पूर्ण झाले आहे. 

मेट्रो- २ ए या मार्गिकेचे काम या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते, मात्र लॉकडाऊनमुळे हे काम आणखी लांबणीवर पडणार आहे. या कामाला गती देण्याच्या कामाला एमएमआरडीए लागली आहे. जे. कुमार या कंपनीने एसएसए या गृपसह मिळून दोन गर्डरचे काम नुकतेच पूर्ण केले. शिंपोली येथील नाल्यावर गर्डरच्या सहाय्याने ३६.६९ मीटर लांबीचे स्टीलचा पूल उभारला आहे. या मार्गिकेवरील आव्हानात्मक काम पूर्ण करण्यात आले. या मार्गिकेवर एकूण सतरा मेट्रो स्थानके उभारण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात गोरेगाव पश्चिम येथे अशाच प्रकारचा गर्डर उभारण्यात येणार आहे. येथे ओशिवरा मेट्रो स्थानक तयार होणार आहे. यासह नंतर पोईसर नदी जवळ असेच गर्डरचे काम करण्यात येणार आहे. 

मेट्रो-४ मार्गिकेवर ६० यु- गर्डरचे काम पूर्ण  : घाटकोपर- मुलुंड- ठाणे- कासारवडवली मेट्रो-४ मार्गिकेवर आणि कासारवडावली ते गायमुख या मेट्रो-४ च्या विस्तारीत मार्गिकेवर सध्या एमएमआरडीएने यु- गर्डर आणि पिअर कॅप बसवण्याची कामे पूर्ण केली आहेत. या मार्गिकेवर आत्तापर्यंत गेल्या एका महिन्यात तब्बल ६० यु- गर्डर बसवले असून १९ पिअर कॅप बसवल्या आहेत. लॉकडाऊनमुळे रत्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने अवघ्या एका महिन्यात आम्हाला इतके काम करणे शक्य झाले असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले. 

 

Web Title: Girder laying work completed for Metro-2A line at Shimpoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.