Join us

GBS व्हायरसमुळे मुंबईत पहिला मृत्यू, राज्यात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू! कशी काळजी घ्यावी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:18 IST

Mumbai GBS Death: गुलियन बॅरी सिंड्रोमची (जीबीएस) लागण झालेल्या मुंबईतील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

First GBS Death in Mumbai: गुलियन बॅरी सिंड्रोमची (जीबीएस) लागण झालेल्या मुंबईतील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मनपाच्या नायर रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ५३ वर्षीय रुग्णाचा जीबीएस व्हायरसमुळे मृत्यू झाल्याच्या माहितीला खुद्द मनपा आयुक्तांनी दुजोरा दिला आहे. यामृत्यूसह जीबीएसची लागण झाल्याने मृत्यू झालेल्यांचा राज्यातील आकडा आता ८ वर पोहोचला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात जीबीएसचे रुग्ण सापडल्याने काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत गेल्या शनिवारी या व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला होता. अंधेरी परिसरातील एका ६४ वर्षीय महिलेला जीबीएसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. राज्यात पुणे जिल्ह्यातच सध्या या व्हायरसचे सर्वाधिक १९७ रुग्ण आढळून आले आहेत. पण आजाराला घाबरण्याची काहीच गरज नाही, असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. 

जीबीएस संसर्गजन्य नाहीजीबीएस हा आजार संसर्गजन्य नसून नागरिकांनी अजिबात घाबरण्याची गरज नाही असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. या आजाराचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज असून व्हेंटिलेटरसह १५० आयसीयू बेड्सची व्यवस्था केली आहे. 

जीबीएसची लक्षणे काय?- श्वास घेण्यास त्रास होणे- बोलण्यात अडथळा- अनियमीत रक्तदाब- अशक्तपणा- हात आणि पाय सुन्न पडणे- डायरिया

बहुतांश खासगी रुग्णालयात या आजाराचे एक ते दोन रुग्ण महिन्याला उपचार घेत असतात. नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. हा आजार एकामुळे दुसऱ्यात होत नाही. विषाणू किंवा जिवाणूमुळे होणार हा आजार आहे. मात्र नेमके कोणत्या संसर्गाने हे अद्याप कुणी सांगू शकलेले नाही. या आजारावर उपचार उपलब्ध आहेत. - डॉ. हर्षद लिमये, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ, मॅक्स नानावटी रुग्णालय

टॅग्स :मुंबईआरोग्यमृत्यू