मुंबई - मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेच्या प्रेमसंबंधाबाबत लग्नापूर्वीच डॉ. गौरी पालवेच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले होते, असा दावा त्याच्या वकिलाने पोलिस कोठडीला विरोध करताना न्यायालयात केला.अशोक पालवे यांनी जबाबात उल्लेख केलेली मूळ कागदपत्रे लातूर येथील रुग्णालयात आहेत. ती ताब्यात घेऊन गौरीचे वडील अशोक पालवे यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा करावी लागेल. अनंत गर्जेसह त्याच्या भावंडांवर देखील आरोप आहेत. त्यांचाही शोध सुरू असून त्यांची चौकशी करणे बाकी असल्याचे सांगत सरकारी वकिलांनी गर्जेच्या कोठडीची मागणी केली.
गर्जेच्या वकिलांचा कोठडीला विरोधगर्जेचे वकील ॲड. मंगेश देशमुख यांनी कोठडीला विरोध करत, दाखल गुन्ह्यातून डॉ. गौरी यांना आरोपीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्ट होत नसल्याचे म्हटले. घटना घडली तेव्हा डॉ. गौरी घरी एकट्याच होत्या. त्यांनी घर आतून बंद केले होते. शिवाय प्रेमसंबंधांबाबत आरोपीने लग्नापूर्वीच डॉ. गौरी यांच्या कुटुंबीयांना कल्पना दिली, असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने गर्जेला २७ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
Web Summary : Gauri's family knew of Anant Garje's affair pre-marriage, lawyer claims. Documents are at a Latur hospital. Police seek custody to investigate allegations against Garje and siblings.
Web Summary : वकील का दावा है कि गौरी के परिवार को अनंत गर्जे के प्रेम संबंध की जानकारी शादी से पहले थी। दस्तावेज लातूर के अस्पताल में हैं। पुलिस गर्जे और भाई-बहनों के खिलाफ आरोपों की जांच के लिए हिरासत चाहती है।