गौरी पालवेंनी मृत्यूपूर्वी मैत्रिणीला पाठवल्या होत्या ऑडिओ रेकॉर्डिंग, अनंत गर्जेच्या अडचणी वाढल्या; आरोपपत्रात काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:40 IST2026-02-10T16:39:50+5:302026-02-10T16:40:56+5:30

Gauri Palve Garje News: डॉक्टर गौरी पालवे यांच्या मृत्यूने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. पंकजा मुंडे यांचे माजी पीए अनंत गर्जे याला मुख्य आरोपी करण्यात आलेले असून, एसआयटीने आरोपपत्र दाखल केले. 

Gauri Palave sent an audio recording to her friend before her death, Anant Garje's problems increased; What's in the chargesheet? | गौरी पालवेंनी मृत्यूपूर्वी मैत्रिणीला पाठवल्या होत्या ऑडिओ रेकॉर्डिंग, अनंत गर्जेच्या अडचणी वाढल्या; आरोपपत्रात काय?

गौरी पालवेंनी मृत्यूपूर्वी मैत्रिणीला पाठवल्या होत्या ऑडिओ रेकॉर्डिंग, अनंत गर्जेच्या अडचणी वाढल्या; आरोपपत्रात काय?

Gauri Palve Garje News in Marathi: मुंबईतील राहत्या घरात पंकजा मुंडे यांचे माजी पीए अनंत गर्जे याच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी आत्महत्या केली होती. अनंत गर्जेच्या त्रासाला कंटाळून पालवे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीने आरोपपत्र दाखल केले असून, त्यात काही ऑडिओ रेकॉर्डिंग, अनंत गर्जेने सामाजिक बदमानामी करण्याची धमकी दिल्याचेही समोर आले आहे. 

पोलिसांना घरात एक डायरी मिळाली होती. त्यात गौरी पालवे यांनी त्यांच्या आयुष्यातील त्रास, मानसिक तणाव आणि अनंत गर्जेकडून होणाऱ्या त्रासाबद्दल लिहून ठेवलेले आहे. त्यांचा लॅपटॉपही पोलिसांनी जप्त केला होता. त्यातही काही पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. 

अनंत गौरीला म्हणाला, 'तू मर' 

तपासात काही ऑडिओ रेकॉर्डिंग मिळाल्या. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी म्हणजे घटनेच्या दिवशी अनंत गर्जे याने मुद्दाम गौरी यांच्यासोबतच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग केले होते. त्या क्लिपमध्ये तो गौरी यांना तू मर असे म्हणत असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. 

ऑडिओ रेकॉर्डिंग नातेवाईकांना पाठवून अनंत गौरी यांची प्रतिमा मलीन करून बदनामी करण्याची धमकी देत होता. याच सततच्या मानसिक त्रासातून गौरी यांनी टोकाचे पाऊल उचलले. 

गौरी यांनी मैत्रिणीला पाठवल्या होत्या १७ ऑडिओ क्लिप

मृत्यूपूर्वी डॉक्टर गौरी यांनी त्यांची मैत्रीण डॉ. प्रणिता अस्वले यांना एकाच वेळी १७ ऑडिओ क्लिप पाठवल्या होत्या. या क्लिपमध्ये अनंतकडून असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाची संपूर्ण माहिती मैत्रिणीला सांगितली होती. 

२२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी गौरी कुठे कुठे गेल्या होत्या, याचीही माहिती आरोपपत्रात दिली गेली आहे. दुपारी ३.०२ वाजता सीसीटीव्ही फुटेजनुसार गौरी या बे लीफ सलून मध्ये गेल्या होत्या. पण, ३.१९ वाजता त्या सलूनमधून बाहेर पडल्या होत्या. त्या सलूनच्या नोंदणी रजिस्टरममध्ये नोंद नव्हती. पण, शेजारी असलेल्या स्किन स्पेशालिस्ट क्लिनिकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे ही माहिती मिळाली. 

Web Title : गौरी पालवे की ऑडियो रिकॉर्डिंग ने मौत से पहले उत्पीड़न का खुलासा किया: पति मुसीबत में

Web Summary : गौरी पालवे की आत्महत्या, कथित तौर पर पति अनंत गर्जे के उत्पीड़न के कारण, ऑडियो रिकॉर्डिंग से सामने आई। एक दोस्त को भेजे गए इन रिकॉर्डिंग में शारीरिक और मानसिक शोषण का विवरण है, जिससे गर्जे की कानूनी मुश्किलें बढ़ रही हैं। कथित तौर पर उसने उसे बदनाम करने की धमकी दी, जिससे उसका दुखद निर्णय हुआ।

Web Title : Gauri Palve's Audio Recordings Expose Harassment Before Death: Husband in Trouble

Web Summary : Gauri Palve's suicide, allegedly due to husband Anant Garje's harassment, revealed audio recordings. These recordings, sent to a friend, detail physical and mental abuse, intensifying Garje's legal troubles. He allegedly threatened to defame her, leading to her tragic decision.