गॅस सिलिंडरमधून गळती, आगीचा मोठा भडका; कांदिवलीतील आगीत होरपरळलेल्या तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 10:08 IST2025-09-29T10:07:10+5:302025-09-29T10:08:41+5:30
स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरमधून गळती झाल्याने भीषण आग लागल्याची घटना बुधवारी कांदिवलीतील आकुर्ली येथे घडली होती.

गॅस सिलिंडरमधून गळती, आगीचा मोठा भडका; कांदिवलीतील आगीत होरपरळलेल्या तिघांचा मृत्यू
मुंबई : स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरमधून गळती झाल्याने भीषण आग लागल्याची घटना बुधवारी कांदिवलीतील आकुर्ली येथे घडली होती. या आगीत होरपळलेल्या सातजणांपैकी तिघांचा रविवारी उपचारादरम्यान
मृत्यू झाला.
कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलेल्या ४७ वर्षीय रक्षा जोशी आणि ऐरोली बर्न हॉस्पिटल येथे दाखल ३१ वर्षीय नितू गुप्ता व २८ वर्षीय पूनम अशी मृतांची नावे आहेत. तिघेही ८० ते ९० टक्के भाजले होते.
कांदिवलीतील मेस्त्री चाळीतील एका गाळ्यात गॅस सिलिंडरमधून गळती झाल्याने आगीचा मोठा भडका उडाला. तिथे असलेल्या काही तेलाच्या डब्यांनीही आगीमुळे पेट घेतला होता. मात्र, विद्युत यंत्रणा व विजेच्या तारांमुळे आग पसरल्याचा दावा अग्निशमन दलाने केला होता.
तिघे गंभीर; किती भाजले?
शिवानी गांधी (५१) ७० टक्के
जानकी गुप्ता (३९) ७० टक्के
दुर्गा गुप्ता (३०) ८५ टक्के
मनराम कमाकट (५५) ४० टक्के