नवरात्रौत्सवात गरबा, दांडिया नाहीच; देवीची मूर्ती ४ फुटांपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 06:32 AM2020-09-30T06:32:23+5:302020-09-30T06:32:32+5:30

आगमन, विसर्जनाची मिरवणूक नसेल : गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

Garba, not Dandiya in Navratri; Idol of Goddess up to 4 feet | नवरात्रौत्सवात गरबा, दांडिया नाहीच; देवीची मूर्ती ४ फुटांपर्यंत

नवरात्रौत्सवात गरबा, दांडिया नाहीच; देवीची मूर्ती ४ फुटांपर्यंत

Next

मुंबई : आगामी नवरात्रौत्सवासाठी राज्याच्या गृह विभागाने मंगळवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार गरबा, दांडिया वा इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. दुर्गादेवीचे आगमन आणि विसर्जनाची मिरवणूकदेखील नसेल. सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीची उंची जास्तीत जास्त चार फूट तर घरगुती मूर्तीची उंची दोन फुटांपर्यंत राहील.

मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक मंडळांनी रक्तदान शिबीर, माझे कुटुंब, माझी जबाबदारी कार्यक्रमाबाबत जनजागृती, कोरोना आदी रोगांबाबत तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती असे उपक्रम राबवावेत.

नवरात्रौत्सव मंडपात निर्जंतुकीकरण, शारीरिक अंतर पाळावे लागेल. उत्सव साधेपणाने साजरा करायचा असल्याने सजावटही तशीच असावी.
मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहू नये आणि तेथे खाण्यापिण्याची व्यवस्थाही करू नये. विसर्जन घरी करणे शक्य नसेल तर कृत्रिम विसर्जनाच्या ठिकाणी ते करण्यास प्राधान्य द्यावे. विसर्जनाच्या वेळी शक्यतो घरीच आरती करून घ्या, विसर्जनस्थळी वृद्ध वा लहान मुलांनी जाणे टाळावे. चाळीतील वा इमारतीतील सर्व घरगुती देवींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितपणे काढू नये, असे नमूद करण्यात आले आहे.

रावण दहन होईल; पण गर्दी व्हायला नको
दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचे कार्यक्रम होतील पण दहनाकरता आवश्यक तेवढ्याच व्यक्ती हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत, फेसबूक वा इतर माध्यमातून थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करून गर्दी टाळली जाईल.

Web Title: Garba, not Dandiya in Navratri; Idol of Goddess up to 4 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.